करमाळा प्रतिनिधी
कोरोना नियमांमुळे आमदार आपले दारी उपक्रम काही काळापुरता पुढे ढकलला आहे. परंतु कामे मात्र आ. संजयमामा शिंदे यांचेकडून अव्याहतपणे सुरू आहेत ती आपल्याला दिसत व समजत नाहीत हा आपला वैचारीक दृष्टीदोष आहे . रावगाव येथील आमदार आपले दारी हा उपक्रम यशस्वी झाला व तद्नंतर ओमायक्रान चे संकट आले मुळे शासनाने कोरोनाचे निर्बंध लादले . त्यामुळे निर्बंधांचे पालन करणेसाठी जातेगाव येथील नियोजीत कार्यक्रम स्थगीत केला गेला होता. आता कोरोनाचे निर्बंध कमी होत असून लवकरच हा उपक्रम आम्ही जनसुविधेसाठी यशस्वीपणे संपूर्ण मतदारसंघात पार पाडू . आपण टीका करीत रहा लोकशाहीत विरोधकांचे हे कामच आहे . मामा आमदार आहेत ते त्यांचे कामे कर्तव्य निष्ठेने दिल्ली – मुंबई वारी करत पार पाडत आहेत . जनता त्यांच्या कामावर खुष आहे, २ वर्षाने का होईना आपण विरोधकांच्या भूमिकेत येवून माजी आमदार आहात हे स्विकारताय हाच मामांच्या विकास कामांचा विजय आहे. असे मत संजयमामा शिंदे मोटार वाहतुक संस्थेचे चेअरमन सुजीत तात्या बागल यांनी व्यक्त केले आहे .
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की ,काम होण्याअगोदरच निवेदन देवून फोटो काढून जनतेला वेड्यात काढण्याचे दिवस आता संपले आहेत याचे भान विरोधकांनी ठेवावे . संजयमामा शिंदे यांनी आमदार झालेपासून मतदार संघातील पाणी, आरोग्य, वीज, डिकसळ पूल, भुसंपादन मोबदला, रस्ते आदी कामांचा जो सपाटा लावला आहे यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरून राजकीय भवितव्याच्या चिंतेने ते ग्रासले आहेत त्यामुळे नैराश्येतून ते वारंवार आ .शिंदे यांचेवर टीका करत आहेत .
आ .शिंदे यांचे शासन दरबारी असलेले वजन, प्रशासनावरील वचक, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भक्कम पाठबळ व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या खंबीर साथीमुळे आ . शिंदे यांचा विकास कामांचा अश्वमेध सुसाट धावत आहे. यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत व आपली राजकीय दुकानदारी कायम स्वरूपी बंद होईल कि काय? या भीतीपोटी व आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ही प्रसिध्दीची अयशस्वी स्टंटबाजी असल्याचे मत देखील सुजीत बागल यांनी व्यक्त केले आहे .
नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या प्रवक्त्यांनी अगोदर आपण कोण आहोत? कोणाच्या बाबतीत बोलतोय? हे बोलण्या अगोदर स्वतःची पात्रता तपासावी. आमच्या ज्ञानानुसार प्रवक्ता पक्षासाठी असतो. परंतु तालुक्यातील गटासाठी सुद्धा प्रवक्ता असू शकतो याची माहिती प्रथमच त्यांनी जनतेला करून दिली हे खूप मोलाचे काम तळेकर यांनी केले आहे. इथून पुढे भविष्यात गल्लीबोळातील गटासाठीही प्रवक्ता नेमला जाईल ही लोकशाहीच्या दृष्टीने अभिमानाची बाब असेल अशी बोचरी टीकाही सुजित बागल यांनी केली.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…