करमाळा प्रतिनिधी
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या आरोग्य सेवा आज करमाळ्यात आली असून या माध्यमातून सामान्यांना मदतीचा आधार मिळेल असा विश्वास माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केला यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल सभापती अतुल पाटील युवा नेते शंभुराजे जगताप माजी सभापती गहिनीनाथ ननवरे मार्केट कमिटीचे संचालक देवानंद बागल प्राचार्य जयप्रकाश बिले सर यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील मनसेचे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड नगरसेवक अतुल फंड महादेव फंड प्रशांत ढाळे कन्हैयालाल देवी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप जे जे युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे डॉक्टर रोहन पाटील डॉक्टर शेलार महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रियंका ताई गायकवाड चिंतामणी दादा जगताप सतीश निळ कल्याणराव सरडे गणेशभाऊ चिवटे आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल डुकरे डॉक्टर मोटे डॉक्टर राहुल कोळेकर डॉक्टर भोसले भाजपचे दीपक चव्हाण शिवसेनेचे अनिल पाटील ठेकेदार शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंत आदी पदाधिकारी उपस्थित होते7 मार्च सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोफत चष्मे वाटप मोफत ईसीजी तपासणी मोफत औषधे वाटप होणार असून याचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे .यावेळी शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद असून कोरूना काळात करमाळा तालुक्यातील जनतेच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे .यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की कोरोना च्या काळात शिवसेनेने हातावर पोट असलेल्या लोकांना मजुरांना दररोज चारशे लोकांना दोन वेळचे जेवण दिले जवळपास दोनशे वीस रुग्णांना रेमडीसिव्हर इंजेक्शन मोफत दिले आहे. शेकडो कुटुंबांना अन्नधान्य मोफत दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…