करमाळा प्रतिनिधी
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तमाम महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांचा आधारस्तंभ ठरत असून या मदत कक्षातून शाश्वत मदत मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे या प्लॅटफॉर्म चे जनक नामदार एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आरोग्य रक्षक ठरत आहेत असे मत शिवसेना नेत्या रश्मी बागल यांनी व्यक्त केले
आरोग्याच्या महायज्ञाच्या दुसऱ्या दिवसाचे शिबिराचे उद्घाटन रश्मी बागल यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर बाजार समिती सभापती शिवाजीराव बंडगर सर,मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय सरडे जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील प्राचार्य जयप्रकाश बिले सर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रियांका ताई गायकवाड बीड जिल्ह्याचे शिवसेना वैद्यकीय पक्षाचे संपर्कप्रमुख बाजीराव जाधव उर्फ सिंघम पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश दादा कांबळे लक्ष्मण भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना रश्मी बागल यांनी करमाळा तालुका आरोग्य क्षेत्रात मागे असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांनी करमाळा तालुक्यात मोठ्या हॉस्पिटलची उभारणी करून मोफत उपचार देण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वामुळे कोरोना काळात सगळ्यात चांगली रुग्णांची सेवा महाराष्ट्रात झाली 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या दिशेनेच शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे काम सुरू आहे नक्कीच भावी काळात करमाळा ब्लड बँक व अत्यंत स्वस्त दरात किंवा कॅशलेस हॉस्पिटलची उभारणी करण्यासाठी आपण प्रयत्न करून मात्र त्यासाठी करणारी सर्व नेतेमंडळींनी योगदान देणे गरजेचे आहे
या रुग्ण सेवेचा लाभ घेण्यासाठी शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती जवळपास एकूण 160 रुग्णांची हृदय तपासणी करण्यात आली यापैकी 30 रुग्णांना अंजॉग्राफी एन्जोप्लास्टी ची गरज असल्याचे निष्पन्न झाले या सर्व रुग्णांना मोफत उपचार वाई येथील हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहेत
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी भ्रमणध्वनीवरून शिवसेनेच्या आरोग्य शिबिराला शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना खासदार शिंदे म्हणाले की आगामी काळात करणार करमाळा तालुक्याला आरोग्यसेवेच्या संदर्भात व इतर विकासासंदर्भात कोणतीही मदत लागली तर नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे.
यावेळी शिवसेना आरोग्य पक्षाविषयी अनुष्का महेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेनेच्या आरोग्मेळाव्यासाठी रुग्णांनी प्रचंड गर्दी केली होती दोन दिवसात या शिबिरात जवळपास तीन हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे.