Categories: करमाळा

युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदाच्या निवडणुकीत वैभवराजे जगताप यांचा एकतर्फी दणदणीत विजय.

करमाळा प्रतिनिधी पक्षांतर्गत निवडणुकीत करमाळा तालुक्यातील युवकांनी वैभवराजे जगताप यांना विक्रमी मतदान करुन पक्षाच्या डोळ्यात एकप्रकारे झणझणीत अंजनच घातले आहे.त्यामुळे वैभवराजे जगताप हेच काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत जणू हा संदेशच काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिला आहे*……
*वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चापलूसी करुन पदे पदरात पाडून घेण्यापेक्षा थेट जनतेतून निवडून येऊन स्वाभिमान आणि सन्मानाने पद मिळवणारे वैभवराजे जगताप हेच करमाळा तालुक्यातील जनतेच्या मनातील नेतृत्व आहे*….
*या विजयानंतर बोलताना वैभवराजे जगताप म्हणाले की माझे आजोबा देशभक्त कै.नामदेवराव जगताप साहेबांपासून आमच्या घरात काँग्रेसचा विचार रुजला आहे.मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष पक्षांतर्गत निवडणुकीत विजय मिळवून झालो आहे म्हणजेच मी कुण्या नेत्यांकडून सिलेक्ट झालो नसून पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून इलेक्ट झालो आहे.लोकशाहीमध्ये सिलेक्शनपेक्षा इलेक्शन महत्वाचे असते. येत्या काळात देशाचे नेते राहुलजी गांधी,सुशीलकुमारजी शिंदे,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पक्ष वाढीसाठी विशेष अभियान राबवणार असल्याचे सांगितले.पक्षनेतृत्वाने कुणाला जरी पदे वाटली तरी तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात मात्र काँग्रेसचे नेतृत्व करण्याची धमक फक्त वैभवराजे जगताप यांच्यातच असल्याचे या पक्षांतर्गत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.*

saptahikpawanputra

Recent Posts

केत्तुरला पुणे-मुंबई एक्स्प्रेसचा थांबा द्या! उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

करमाळा : प्रतिनिधी केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा…

12 mins ago

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

    करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…

15 hours ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

  करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

22 hours ago

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

2 days ago

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…

2 days ago

पुणे शिक्षक मतदार संघ कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार मुकुंद साळुंखे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…

4 days ago