करमाळा प्रतिनिधी स्त्री ही जगाची जननी असून स्त्रियांनी चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून पुरुषाच्या बरोबरीने आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी असे मत जिजाऊ महिला ग्रुपच्या अध्यक्षा नगरसेविका सौ स्वाती महादेव फंड यांनी व्यक्त केले. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्याप्रंसगी बोलत होत्या.जिजाऊ महिला ग्रुपच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.सामाजिक उपक्रमास मदत देऊन महिला दिन साजरा करण्यात आला असून सामाजिक बांधिलकीची भावनेतून निराधार वृद्ध अपंगांना मोफत अन्नदान करून अन्नपूर्णा योजना चालवणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठानला मदतीचा एक हात म्हणुन शंभर किलो गहू,साठ किलो तांदूळ एक तेलाचा डबा असे दहा हजार रुपयांचे किराणा मालाचे दान करण्यात आले.या कार्यक्रमात वृध्द निराधार विधवा महिलांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. जिजाऊ ग्रुपने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रमाद्वारे अन्नदान करून महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला याबद्दल श्रीराम प्रतिष्ठाचे अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांनी जिजाऊ महिला ग्रुपचे आभार मानुन कौतुक केले. या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार नासीर कबीर, प्रमोद फंड उपस्थित होते. यावेळी निराधार जेष्ठ महिला व जेष्ठ नागरिकांचा जिजाऊ ग्रुपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले व स्वतंत्र स्वराज्य निर्मिती करण्याचा संकल्प पुर्ण केला.महाराष्ट्राच्या भुमिमध्ये राणी ताराबाईने औरंगजेब रडवला,मैं झाशी नहीं दुंगी असे इंग्रजांना ठणकावून सांगत इंग्रजाबरोबर संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई स्त्री शिक्षणाची महती ओळखुन स्त्रियांना शिक्षणाचे दारे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्रियांचे सबलीकरण झाले आहे आजच्या काळामध्ये नारीशक्ती हिच खरी शक्ती आहे. घरात तिला आदर द्या प्रेम जिव्हाळा जिणे शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला आहे अशा महिलांचा सन्मान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कविता निळ,भारती शेंडे, सुनीता भोसेकर,संध्या कट्टमनी,माया भागवत,पुष्पा गोसावी,राणी नाईकवाडी, वैशाली देवकर,भारती ओढणे,पल्लवी साडेकर, साधना जाधव,शुभदा घोलप, नंदा बोराटे,वंदना पाटील, विजयमाला चवरे, सोनिया राठोड,रेश्मा सूरवसे, वैशाली कोळी, सुनीता सातव , सुनीता शिंगाडे,शमा बोधे, शितल फंड,अर्चना फंड,कल्याणी काळे,राणी राऊत, मंगल ससाणे,ज्योत्सना बनकर, अनुश्री कुलकर्णी,अलका बरुटे, रूपाली राजेभोसले, कविता नीळ,सविता चिवटे,प्रतिभा घाडगे, शितल करे पाटील,स्वातीताई फंड,प्रणिता जव्हेरी , मनिषा मोरे , कविता मोरे,अनिता राऊत,प्रमिला शिंदे,सुवर्णा पोतदार,रोहिणी फंड,निरा फंड, संध्या शिंदे रेखा इंगोले, सुरेखा खरात यांच्यासह जिजाऊ ग्रुपच्या सर्व महिला श्रीराम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व निराधार अपंग वृद्ध जेष्ठ नागरिक महिला लाभार्थी उपस्थित होते.