प्राणीमित्र डॉक्टरांच्या सहकार्याने बाॅबीला मिळाले जीवदान

करमाळा  प्रतिनिधी करमाळा शहरातील कुंकू गल्ली येथील बाॅबी नावाच्या श्वानास पायावर गाडी गेल्यामुळे दोन पायाला जखम झाल्याने बाॅबीची तब्येत बिघडली होती. त्यामुळे ती झोपुन बाॅबी वेदनेने विव्हळत होती अशा अवस्थेत प्राणीमित्र पुर्वा पांढरे,प्राची वायकर,जान्हवी सुर्यवंशी,तन्वी सुर्यवंशी, आनंदी होनप,साची होनप,रूद्राक्ष होनप,अगस्ती होनप,श्रध्दा शहा,दर्शना शहा या प्राणीमित्रांनी सरकारी दवाखान्यात जाऊन पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण कांबळे यांना बाॅबी या कुत्रीवर ताबडतोब उपचार करावा अशी विनंती केली त्या विनंतीनुसार सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डाॅ‌.हंबीरराव डुकळे यांनी कुंकू गल्ली येथे स्वतः येऊन बाॅबीला इंजेक्शन देऊन व ड्रेसिंग केले त्यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्यामुळे बाॅबी या कुत्रीचे प्राण वाचले असुन प्राणिमित्रांनी डॉक्टर बाळकृष्ण कांबळे हंबीरराव डुकळे यांनी मुक्या प्राण्यांचा प्राण वाचवुन माणुसकीचा धर्म पाळल्यामुळे आभार मानुन कौतुक केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago