करमाळा प्रतिनिधी :- जागतिक महिला दिनाचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून करमाळा शिवसेना महिला आघाडी व युवा सेनेच्या वतीने दि.१२ व १३ मार्च २०२२ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन किल्ला विभाग, जुन्या कोर्टासमोर, करमाळा येथे सायंकाळी ०५.०० वाजता करण्यात आले आहे. यावेळी दि. १२ मार्च २०२२ रोजी लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित केली आहे तर दि. १३ मार्च २०२२ रोजी महिलांकरिता गुणगौरव अस्मितेचा – गुणगौरवक केलेचा – खेळ खेळू पैठणीचा या कार्यक्रमांतर्गत विविध गुणदर्शन व स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदरच्या कार्यक्रमाचे उदघाटन हे शिवसेना माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना प्रवक्त्या तथा सोलापूर महिला संपर्क प्रमुख संजनाताई घाडी ह्या राहणार आहेत.
यावेळी शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मागील २ वर्षांपूर्वी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोविड १९ ची सुरुवात झाल्याने व महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोविड कालावधीत कोणतेही गर्दी होणारे कार्यक्रम घेऊ नये असे आदेशित केल्याने त्यावेळी सर्व कार्यक्रम तहकूब केले होते. परंतु आता कोविड चा धोका कमी झाल्याने पुन्हा महिलांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमामध्ये प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजेत्या होणाऱ्या महिलेस सन्मानचिन्ह देण्यात येईल तसेच कार्यक्रमास लवकर येणाऱ्या व शेवट पर्यंत उपस्थित राहणाऱ्या महिलांमधून ७ लकी ड्रॉ काढण्यात येथील त्यामध्ये पैठणी, डिझायनर साडी, सोन्याची नथ, मिक्सर, फॅन, हेअर ड्रायर, आर्टिफिशिअल ज्वेलरी इ. भरगोस बक्षिसाचे वाटप महिलांना करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. पुढे बोलताना त्यानीं सांगितले की, संपूर्ण कार्यक्रम हा बंदिस्त वातावरण व आकर्षक विद्युत रोषणाई व उत्कृष्ट साउंड सिस्टीम मध्ये तसेच महिला पोलीस सुरक्षांसह पार पडणार आहे. कार्यक्रमावेळी कोणत्याही महिलेस मोबाईल द्वारे चित्रीकरण अथवा फोटो काढण्यास मनाई करण्यात आली आहे. जेणेकरून कार्यक्रम सुरक्षित वातावरणात पार पडेल.
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना…
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…