करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अर्थसंकल्पामध्ये करमाळा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी 24 कोटी निधीची तरतूद झाली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. 2022 -23 या अर्थसंकल्पामध्ये प्रमुख्याने…
मिरगव्हाण – अर्जुननगर – शेलगाव क – सौंदे – वरकटणे – कोंढेज रस्ता प्रजिमा 8 सुधारणा करणे या रस्त्यासाठी 1 कोटी 90 लाख, पांडे – शेलगाव क – साडे- घोटी -केम रस्ता प्रजिमा. 10 सुधारणा करणेसाठी नाबार्डकडून 1 कोटी 77 लाख , रोपळे – केम- वडशिवणे -कंदर कनेरगाव प्रजिमा 12 सुधारणा करणे यासाठी 1 कोटी 90 लाख ,पारेवाडी – राजुरी- अंजनडोह – कोंढेज – निंभोरे – मलवडी – दहिवली- कनेरगाव – वेणेगाव रामा क्रमांक 9 ला जोडणारा प्रजिमा क्रमांक 4 सुधारणा करणे यासाठी 3 कोटी 25 लाख, कोर्टी – दिवेगव्हाण -पारेवाडी रेल्वे स्टेशन – केत्तुर 2 ते पोमलवाडी स्ता प्रजिमा 124 सुधारणा करणे यासाठी 2 कोटी 25 लाख , कुर्डूवाडी परंडा रस्ता रामा 210 सुधारणा करणे 2 कोटी 50 लाख, केम ढवळस पिंपळकुटे रस्ता प्रजिमा 14 सुधारणा करणे 2 कोटी 85 लाख, बोरगाव करंजे मिरगव्हाण कोळगाव निमगाव गौंडरे नेरले ते वरकुटे घोटी निंभोरे ते जेऊर रस्ता – 2 कोटी 85 लाख, ढवळस चोभे पिंपरी कव्हे रस्ता प्रजिमा 15 – 1 कोटी 90 लाख , कव्हे लहू म्हैसगाव ते रामा 145 ला मिळणारा रस्ता प्रजिमा 16 – 1 कोटी 90 लाख असे एकूण 10 रस्त्यांच्या विकासासाठी 24 कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद रस्ते योजनेअंतर्गत मतदार संघातील साडे, दिल्मेश्वर, गुळसडी, सालसे, रावगाव , फीसरे, उपळवटे ,महादेववाडी आदी 32 गावातील रस्त्यांसाठी 4 कोटी पेक्षा अधिक निधीची तरतूद झाली असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
याशिवाय करमाळा शहरांमध्ये टाऊन हॉल बांधणे, नगरपरिषद इमारतीचे बांधकाम करणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे यासाठीही 10 कोटींहून अधिक निधीची तरतूद होणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…