करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांना साखर धंद्यातील प्रचंड अनुभव असून ते अत्यंत सक्षम पणे चार साखर कारखान्याचा कारभार पाहत आहेत शिवाय आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकार तत्त्वावर आमदार संजय मामा शिंदे यांनी चालवावा अशी संपूर्ण तालुक्यातील ऊस उत्पादकांची इच्छा आहेअसे मत आमदार संजय मामा शिंदे यांचे कट्टर समर्थक व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत काका सरडे यांनी व्यक्त केले आहे.
आदिनाथ भाडे करार तत्त्वावर चालविण्यास देण्यास सभासदांचा प्रचंड विरोध आहे काही स्वयंघोषित पुढारी स्वतःची किंमत वाढवण्यासाठी बारामती ॲग्रो चे गुणगान गात आहेत
स्वतःच्या स्वार्थासाठी तालुक्यात चा स्वाभीमान असलेला आदिनाथ कारखाना भाडेकराराने देण्याची भाषा बोलणारे करमाळा तालुक्यातील काही फितूर सूर्याजी पिसाळ सारखी राजकीय मंडळी कार्यरत झाली आहेत.गेली तीन वर्ष कारखाना बंद असल्यामुळे ऊस उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले आहे शिवाय बारामती ॲग्रो आणि करार केल्यानंतर वेळेत कारखाना सुरू केला नाही यामुळे जवळपास 20 ते 22 कोटी रुपयांचे व्याज वाढले आहे शिवाय दोन वर्षाचे वार्षिक भाडे सुमारे 15 कोटी रुपये बुडाले व आदिनाथ कारखान्याला जाणीवपूर्वक अडचणीत आणलेल्या प्रक्रियेमुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पेटवून देण्याची वेळ आली या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता आता हा कारखाना सहकार तत्त्वावर करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या मालकीचा राहिला पाहिजे.संजय मामा शिंदे तालुक्याचे आमदार आहेत सहकार तत्वावर कारखाना सक्षम पणे चालवण्याची धमक त्यांच्यात आहे सभासदांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि कारखाना सहकार तत्त्वावर राहिला तरच करमाळ्यातील ऊस उत्पादकाला व सभासदांना स्वाभिमानाने जगता येणार आहे
आमचा आमदार रोहित दादा पवारांना विरोध नाही त्यांनी कारखाना चालवण्यास घेतल्यानंतर आम्हाला आनंद झाला होता मात्र दोन वर्षे ते कारखाना सुरू करू शकले नाही
रोहित दादा पवार यांचे नाव वापरून करमाळा तालुक्यात स्वतःची मक्तेदारी निर्माण करायची व तालुका गुलाम करायचा या प्रवृत्तीच्या लोकांना करमाळ्यातील जनतेने ओळखले आहे यामुळे हा कारखाना संजय मामा शिंदे यांनी चालवावा यासाठी सर्व सभासदांची शिष्टमंडळ घेऊन आमदार संजय मामा शिंदे यांना साकडे घालणार आहोत.आदिनाथ साखर कारखान्याची निवडणूक लांबविण्यासाठी तालुक्यातील काही पुढारी प्रयत्न करत आहेत मात्र आदिनाथ ची निवडणुक वेळेवरच घ्यावी अशी मागणी आम्ही सहकार मंत्र्यांना भेटून करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.