छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सर्वसामान्य नागरिक शेतकरी जनता यांच्या हितासाठी शिवसेना कटीबद्ध- महेश दादा चिवटे

करमाळा प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी मजूर सुखी राहायला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून रयतेचे राज्य निर्माण केले त्यादृष्टीने करमाळा तालुक्यातील शिवसेना कामकाज करीत असून सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाण्यासाठी करमाळा शिवसेना खंबीर असल्याचे मत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केलेशिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला करमाळा शिवसेनेच्यावतीने महेश चिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर गरजू लोकांना मोफत औषधोपचाराचे वाटप करण्यात आले.तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना आदिनाथ साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष  हरिदास डांगे विद्या विकास मंडळाचे माजी प्राचार्य जयप्रकाश बिले सर सोलापूर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे माजी शहरप्रमुख संजय आप्पा शिलवंत उपशहर प्रमुख राजेंद्र काळे युवा सेनेचे शहरप्रमुख विशाल गायकवाड संभाजी ब्रिगेडचे निलेश चव्हाण खंडू चांदगुडे अमरनाथ चिवटे  राजेंद्र मेरगळ युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख मयुर यादव युवा सेनेचे तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे संजय जगताप पत्रकार नागेश चेंडगे नासिर कबीर प्राध्यापक आशोक नरसाळे आदीजण उपस्थित होते
यावेळी बोलताना माजी शहरप्रमुख संजय अप्पा शिलवंत म्हणाले की करमाळा शहरातील प्रत्येक वर्गात जाऊन सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या समस्या समजून घेऊन त्यांना मोफत उपचार औषध उपचार देण्याची कामकाजाची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे शिवसेना युवासेना महिला आघाडी हे सर्व जण मिळून एकत्रितपणे येत्या महिनाभरात हा उपक्रम संपूर्ण शहरात राबवणार आहे
#########
######$$
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आरोग्य शिबिर घेऊन चौदाशे रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले व कोरूना काळात 220 रुग्णांना मोफत रेमडीसिव्हर  इंजेक्‍शन दिले याबद्दल शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा सत्कार शिवसैनिकांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त करण्यात आला.
saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

19 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

22 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

2 days ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

3 days ago