करमाळा प्रतिनिधी सावडी, कुंभारगाव, देलवडी आणि जिंती हि एकत्र फिडर असल्यामुळे वेळोवेळी लाईट ट्रिप होतं आहे. सध्या उन्हाळ्याच्या झळा शेतकऱ्यांना बसल्यामुळे लाईटची मागणी वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लाईटची या भागात कमतरता जाणवते. इलेक्ट्रिक मोटर चालत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळत चालली आहेत. म्हणून जिंती व कुंभारगाव फिटर महावितरण विभागाने वेगळे करावे अशी मागणी जनशक्ती संघटनेने एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोना अभावी अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. दुसऱ्या बाजुने कारखानदार ऊस नेत नाहीत. ऊसाची परिस्थिती गंभीर आहे. अजुन बराचसा ऊस जागेवरच आहे. आणि अशा परिस्थितीत ऊस तोडीवाले टनाला २०० रुपये मागत आहेत. अशी एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. फळबागा, भाजीपाला होरपळून जात आहेत आणि पहिल्यांदाच हा भाग तर बॅकवाटरचा नसून जिरायत भाग आहे आणि या भागात बोरवर विहीरीवर पाण्याची एकदम कमतरता असते आणि अशा कमतरतेत एका बाजुने महाराष्ट्र राज्य शासनाने लाईट तोडून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. इतक्या दिवस लाईट तोडली आणि ३ महिन्यांसाठी लाईट जोडली. तरी या ठिकाणी व्यवस्थित लाईट मिळत नाही. म्हणून त्वरीत जिंतीचा, कुंभारगावचा फेडर वेगळा केला तरच देलवडी, सावडी कुंभारगाव आणि रामवाडीचा काही भाग याठिकाणी व्यवस्थित होईल आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना कुठंतरी जीवन जगण्यापुरते पैसे शेतातुन उपलब्ध होतील. अन्यथा ड्राय भागातील शेतकऱ्यांना लाईटमुळे आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून त्वरीत जिंती आणि कुंभारगाव हे फिडर वेगळे करुन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.