करमाळा प्रतिनिधी क्रिऄटिंग होपस् कॅनडा ,सक्षम करमाळा आणि भारत विकास परिषद करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग साठी करमाळा शहरामध्ये कृत्रिम (जयपूर फुटस)पाय ,हात आणि कॉलिपर्स देण्यासाठी मोजमाप शिबीर श्री दत्त मंदिर विकास नगर येथे संपन्न झाले. या शिबीरामध्ये एकुण 115 जणांची तपासणी करून तपासणी अंती 85 जणांना कृत्रिम अवयवाची आवश्यकता असल्याचे निदान झाले. तसेच त्यांना कृत्रिम अवयव देण्याचे ठरले आहे. लवकरच त्यांना कृत्रिम अवयव बसवण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाचे उद्घघाटन विनय खटावकर(पुणे), अनिरुद्ध पाटणकर(पुणे), वासुदेव कालरा(पुणे), महेश टंकसाळे(पुणे), गहिनीनाथ नलावडे (पुणे), अनिरुद्ध पाटील(बार्शी), सुहास देशमुख(बार्शी), अनंत कवठाळे(बार्शी), गणेश करे पाटील, श्रेणिक खाटेर, सचिन साखरे, मुकुंद राजोपाध्ये, डॉ श्रीराम परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी दिपक चव्हाण (सिनेट सदस्य सोलापूर विद्यापीठ ) , मिथिल राजोपाध्ये, नरेंद्रसिंह ठाकूर(संजय गांधी निराधार सदस्य) , अमरजित साळुंखे(सचिव सर्वोदय प्रतिष्ठान) , बाळकृष्ण कुलकर्णी, सचिन चव्हाण, मनोज कुलकर्णी, संजय कुलकर्णी, चैतन्य पाटील, निलेश जोशी, प्रेम परदेशी, महेश राजोपाध्ये, महेश शहाणे, सुनील पाटील, सुशांत कुलकर्णी, पत्रकार विशाल घोलप, सचिन दुधे, दिलीप शिरगिरे, दत्ता कांबळे, सागर दळवी, विनायक दाभाडे सुरज मिसाळ उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…