Categories: करमाळा

करमाळा भाजपाच्यावतीने शहीददिन साजरा

करमाळा प्रतिनिधी   क्रांतिवीर भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी  देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्यांना ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जातो असे मत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले ते भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने किल्ला वेस येथे स्मृती दिनानिमित्त बोलत होते यावेळी प्रतिमेचे पूजन राधेश्याम देवी श्याम सिंधी , महेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की ब्रिटीश  सायमन  कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. यामुळे चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश अधिकारी साँडर्सला गोळ्या घालून ठार केले होते. या प्रकरणी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली. 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी तिघांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी तिघांनी ‘मेरा रंग दे बसंती चोला, हे गाणे गायले होते.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अशा हजारो हजारो क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले आहे.भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंके शहर अध्यक्ष जगदीश आगरवाल ,संजय गांधी निराधार समितीचे नरेंद्रसिंह ठाकुर ,भगवान गिरी ,प्रदीप देवी ,सुजित दोशी, मयूर देवी, सचिन चव्हाण, सचिन पांढरे ,श्यामसिंधी ,सागर दळवी दीपक पडवळे चेतन ढाळे अमोल महाडिक प्रेमकुमार परदेशी रवी कुलकर्णी आदीजण उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

4 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

7 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

7 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago