श्री कमलादेवी देवस्थान देवीचामाळ साठी 4 कोटी निधी मंजूर … पर्यटन विभागाकडून निधी मिळवणारा करमाळा हा सोलापूर जिल्ह्यातील एकमेव तालुका… आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी
प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2021- 22 अंतर्गत पुणे विभागातील नवीन कामांना 83 कोटी 54 लाख निधी मंजूर झाला असून त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव करमाळा तालुक्यासाठी 4 कोटी निधी मंजूर झाला असून त्यापैकी दीड कोटी निधी जिल्हा परिषद सोलापूर कडे वर्ग झाला असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. हा निधी मंजूर मंजूर करणेकामी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे ,राज्यमंत्री ना.आदिती तटकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देवीचामाळ हे ब वर्ग तिर्थक्षेत्र आहे.या तीर्थक्षेत्रसाठी आ. संजयमामा शिंदे ज्या वेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी भरीव निधी दिलेला होता. आमदार झाल्यानंतर त्यांनी पर्यटन विभागाकडून यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली.
या निधीमधून कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीट करणे व व पेविंग ब्लॉक बसवणे यासाठी 99. 80 लक्ष ,श्रीक्षेत्र कमला देवी मंदिराकडे जाणारे रस्ते डांबरीकरण करणे यासाठी 67. 64 लक्ष, श्रीक्षेत्र कमलादेवी मंदिर क्षेत्रास संरक्षक भिंत बांधणे यासाठी 148. 76 लक्ष,श्री. कमलादेवी मंदिरासाठी वाहनतळ करणे 90.40 लक्ष, कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्त्यासाठी स्ट्रीट लाईट बसवणे 15 लक्ष, कमलादेवी मंदिर यात्री निवास बांधने 80 . 54 लक्ष , कमलादेवी मंदिर क्षेत्र स्नानगृह, मुतारी बांधणे 21.72 लक्ष, मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे 6 लक्ष ही कामे या निधीमधून होणार आहेत.
निधी खेचून आणण्यामध्ये व विकासाचा मास्टरस्ट्रोक लगावन्यायामध्ये आमदार संजयमामा शिंदे हे माहीर आहेत त्याची एक झलक त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिली आहे. त्यामुळे करमाळा हा सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन विभागाकडून निधी मिळवणारा सोलापूर जिल्ह्यातील एकमेव तालुका ठरला आहे.
कमलाभवानी मंदिरास प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्यामुळे मंदिराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल देवीचामाळ ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

13 hours ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

1 day ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

1 day ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

4 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago