पोमलवाडी ता. करमाळा ते मौजे चांडगाव ता. इंदापूर या दरम्यानच्या पुलासाठी आ. संजयमामा शिंदे यांचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना साकडे …

करमाळा प्रतिनिधी
  5 एप्रिल रोजी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे  आ. संजयमामा शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची दिल्ली येथे भेट घेऊन करमाळा तालुक्यातील पोमलवाडी ते इंदापूर तालुक्यातील चांडगाव यादरम्यान पुलाचे बांधकाम व्हावे या ड्रीम प्रोजेक्टसाठी साकडे घातले.
      यासंदर्भात आमदार शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा मतदारसंघातील मौजे पोमलवाडी, ता. करमाळा जि. सोलापूर ते चांडगाव, ता. इंदापूर जि. पुणे यादरम्यान भीमा नदी पात्रावर पूल उभारण्याची मागणी होत असून हा पूल झाल्यास गोवा – कोल्हापूर – सातारा – फलटण – नातेपुते – वालचंदनगर – लोणी देवकर चांडगाव ते पोमलवाडी – कोर्टी – करमाळा – राशिन – अहमदनगर – औरंगाबाद असा मार्ग जोडला जाणार आहे .यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडला जाईल .  वस्तुतः या दोन्ही गावांचे मधील अंतर हे 737.395 मीटरचे असून दोन्ही बाजूला अप्रोच रस्ते पूर्वीपासून आहेत त्यामुळे भूसंपादनाची कोणतीही आवश्यकता भासणार नाही.
        सदरचा पूल अस्तित्वात आल्यास पर्यायी मार्गाची व्यवस्था व दळणवळण वाढीस लागणार आहे व या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. बाजारपेठा जवळ आल्याने उद्योगधंद्यांना चालना मिळणार असून रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. या भागातील शेती व शेतीपूरक व्यवसाय यांना यामुळे चालना मिळेल .या भागात पर्यटनाला देखील उपलब्धी असून मध्य रेल्वेचा मार्ग आणि NH 65 हा राष्ट्रीय महामार्ग फक्त 7 किमी अंतरावर येणार आहे.आज या ठिकाणी दिवसभर लॉन्चद्वारे प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालत असून यासाठी आपल्या स्तरावरून या महत्त्वाकांक्षी पुलासाठी निधी उपलब्ध झाल्यास हा एक विकास मार्ग… पर्यटन मार्ग ठरणार आहे. सदरचा पूल ( ब्रिज )साठी स्थळपाहणी होऊन निधी उपलब्ध व्हावा ही विनंती. अशा आशयाचे पत्र आमदार शिंदे यांनी गडकरी साहेबांना दिलेले असून यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे.
saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago