करमाळा प्रतिनिधी शनिवार दिनांक ९ एप्रिल २०२२ रोजी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा.रामदासजी झोळ (सर) यांच्या ११ एप्रिल रोजी असणाऱ्या यावर्षीच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त दत्तकला शिक्षण संस्था व दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्यु.कॉलेज यांच्या संयुक्त विदयमाने केत्तूर १, ता.करमाळा या ठिकाणी दत्तकला टॅलेंट सर्च या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. प्रा. झोळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी एखाद्या नवीन उपक्रमाचे आयोजन केले जाते.ही घेण्यात येणारी परीक्षा इ.१ ली ते इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.या परीक्षेसाठी करमाळा आणि तालुक्यातील ३१ शाळांमधील १५६५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त रित्या प्रतिसाद नोंदवला गेला.कोरोना च्या काळानंतर तालुक्यामध्ये प्रथमच अश्या प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केले व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.तसेच,या स्पर्धेसाठी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आली होती व स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.ह्या स्पर्धेस संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदासजी झोळ (सर),संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ (मॅडम),संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.विशाल बाबर,स्कूल विभागाच्या संचालिका सौ.नंदा ताटे इ.उपस्थित होते.विद्यार्थ्याना संबोधित करताना अध्यक्ष प्रा. झोळ सर म्हणाले की,विद्यार्थी हे पुढील पिढी घडवत असतात.त्यामुळे,शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी झळकण्यासाठी भविष्यात अश्या प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करून विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले पाहिजे व सर्व विद्यार्थ्याना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेच्या सचिव सौ. झोळ मॅडम म्हणाल्या की,ह्या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अभ्यासाला अनुसरून वेगळा उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याचे काम केले आहे.ही स्पर्धा दत्तकला आयडियल स्कूल चे प्राचार्य प्रा.विजय मारकड (सर), दत्तकला इंटरनॅशनल स्कूल च्या प्राचार्या सौ.सिंधू यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली व ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…