करमाळा प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती सोहळ्यामध्ये कु. जान्हवी राहुल सावंत हीने अभिवादनपर केलेल्या भाषणाबद्दल आज करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी कौतुक करून कु.जान्हवीचा सत्कार केला. यासाठी आमदार संपर्क कार्यालयात आ. संजयमामा शिंदे यांनी स्वतः कु.जान्हवीला बोलावून तिचे कौतुक केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथे हजारोंच्या जनसमुदाया समोर कु.जान्हवी हिने प्रासंगिक, मुद्देसूद आणि आवेशपूर्ण भाषण केले होते.. जान्हवीचे भाषण काल दिवसभर सोशल मिडियावर चर्चेत होते. सोशल मिडियातून हजारोंच्या संख्येने तिचे भाषणाला लाइक्स व कमेंट्स मिळाल्या… कु.जान्हवी ही आमदार समर्थक पंचायत समितीचे माजी सदस्य व हमाल पंचायतीचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांची कन्या असुन तिचे भविष्यकालीन वाटचालीस आ. संजयमामा शिंदे यांनी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.. या कौतुक सोहळा प्रसंगी ॲड. राहुल सावंत, दादासाहेब सावंत, तानाजी बापु झोळ, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जाधव, उद्धवदादा माळी,दत्ता भाऊ जाधव, भोसे चे सरपंच भोजराज सुरवसे, पाडळी चे सरपंच गौतम ढाणे,नेरले चे सरपंच समाधान दोंड, गुळसडी चे माजी सरपंच मानसिंग भैय्या खंडागळे, युवा नेते रवींद्र वळेकर, सुरज ढेरे , ब्रह्मदेव राख, आदी उपस्थित होते..
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…