केम येथील उत्तरेश्वर देवस्थानाच्या अन्नछत्राचा 9 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी   करमाळा तालुक्यातील केम येथे श्री *उत्तरेश्वर मंदिर अन्नछत्र 9 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री उत्तरेश्वर मंदिर येथे वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या सकाळी सात वाजता श्री उत्तरेश्वर महाराज शिवली॑गास लघुरुद्र अभिषेक झाला सकाळी आठ ते दहा वाजता 51 दांपत्याच्या शुभहस्ते सामुदायिक सत्यनारायण महापूजा करण्यात आली. केमचे सुपुत्र जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सपत्निक सत्यनारायण व शिवाची पूजा केली सकाळी दहा वाजता वर्षभरातील अन्नछत्र दात्यांचा यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
सकाळी साडे दहा वाजता हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार झी टॉकीज फेम विनोद रोकडे महाराज कोरगावकर यांचे सुश्राव्य हरिकीर्तन किर्तन होऊन दुपारी एक ते तीन वेळेस ग्रामस्थांना व शिवभक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला ‌यावेळी केम व परिसरातील शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.याप्रसंगी हजारोच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते यावेळी  उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन दादासाहेब गोडसे व ट्रस्टचे सर्व सदस्य तसेच श्री उत्तरेश्वर रक्तदान संघटना यांनी सर्व शिव भक्तांचे स्वागत केले.
saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago