त्स्त्यांा्स्त्यां््स्त्यांा्स्त्यां्स्त्यांा्स्त्यां््स्त्यांा्स्त्या
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथे हनुमान जयंती चे औचित्य साधून भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भारत विरुद्ध इराण निकाली कुस्त्याच्या जंगी मैदानात नेत्रदीपक कुस्त्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले या मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्राचा तुफानी मल्ल सिंकदर शेख विरुध्द पंजाब चा पैलवान भुपेंद्रसिंग अंजनाला या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागुन राहीले होते तिन महिन्यापूर्वी पंजाब मध्ये याच भुपेंद्रसिंग ने पै सिंकदर शेख वर गुणावर विजय मिळवला होता सिंकदर चे विजय अश्व त्यानंतर चौफेर उधळत होते महाराष्ट्र केसरी तुन पिछेहाट झाल्यानंतर 2019 चा महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर ज्याने 2018ला सह्याद्री कारखाना शिरवडे ला सिंकदर वर लिलया विजय मिळवला होता त्यानंतर चालू कुस्ती हंगामात खराडी येथे ही कुस्ती बरोबरीत सुटली दिनांक 17 एप्रिल रोजी अवघ्या दोन दिवसापूर्वी पै.सिंकदर शेख ने हर्षवर्धन सदगीर वर लोणी काळभोर येथे विजय मिळवला होता करमाळकर मंडळीनी मात्र सिंकदर शेख विरूध्द कुस्ती खरसेल व्हावी यासाठी जोड मात्र खट्ट शोधुन काढली पैलवान सिंकदर शेख ची आक्रमक खेळी पाहता पै.भुपेंद्रसिंग किती वेळ टिकेल याची सर्वाना साशंकता असतानाच भुपेंद्रसिंग कडुन सिंकदर पराभूत होणे हे सिंकदर प्रेमीना पचवायला जडच गेले मात्र कुस्ती म्हटले की हार जीत होत रहाते आजचा पेपर उदयाची रद्दी असते कुस्ती लढत इतिहास रचत राहीले पाहिजे ही कुस्ती पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आयोजक पै.सुनील बापु सावंत यांच्या हस्ते लावण्यात आली असून या रोमहर्षक लढतीत पै.भुपेंद्रसिंग यांने डंकीन डावावर पै.सिंकदर शेख वर मात करून विजय मिळवला तर दुसरे क्रमांकाची कुस्ती इराण देशाचा पैलवान अली इराणी व पुणे जिल्ह्य क्रिडा संकुल चा पै.सुरज निकम यांचे मध्ये झाली असुन पै.निकम यांने पै अली इराणी वर खिस्सा डावावर चितपट केले सुरवातीला लहान मोठे कुस्तीस प्रारंभ करण्यात आले असून यामध्ये 100 रुपये पासून 51000 रुपये पर्यंत नेमून कुस्त्या झाले असुन या मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अनील जाधव पै योगेश पवार. पै.विलास डायफोडे पै शाहरूख खान पै.शंभूराजे सावंत पैलवान संतोष जगताप पै.विशाल लोकरे पै विकास धोत्रे पै जय जाधव या सह मैदानात चित्तथरारक निकाली कुस्त्या झाल्या यावेळी करमाळा तालुक्याचे तहसीलदार समीर माने. विद्या विकास मंडळाचेसचिव विलासराव घुमरे नगरसेवक अल्ताफ शेठ ताबोंळी नगरसेवक श्रेणीक खाटेर. यश कल्याणी सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील मुंबई चे पोलिस निरीक्षक महेश पाटील कर्जत चे प्रवीण घुले पाटील पंचायत समितीचे सभापती डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव पंचायत समिती चे सदस्य दत्तात्रय जाधव उपमहाराष्ट्र केसरी विजय नाना मोडाळे परांडेचे वस्ताद नवनाथ आप्पा जगताप वामनभाऊ उबाळे महाराष्ट्र चॅम्पियन काकासाहेब शेळके शिवसेना ता. प्रमुख सुधाकर लावंड नगरसेवक संजय सावंत पंचायत समिती चे सदस्यअॅड राहुल सावंत.आजीनाथ कोळेकर वस्ताद पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उबाळे. भोसेचे सरपंच भोजराज सुरवसे. हाजी फारूक बेग नगरसेवक प्रशांत ढाळे नगरसेवक अॅड नवनाथ राखुंडे. युवा नेते अमीरशेठ तांबोळी हिसरे चे सरपंच पै बाळासाहेब पवार चिखलठाण चे सरपंच चंद्रकात काका सरडे कृ.उ.बा.समिती चे संचालक संतोष वारे देवानंद बागल नासीर कबीर संजय रोडे पाटील डाॅ हरीदास केवारे दिनेश भांडवलकर चंद्रकात काळे सतीश शेळके बापुराव गायकवाड प्रवीण कटारिया प्रवीण जाधव अतुल फंड महादेव फंड संजय घोलप आदी जण उपस्थित होते यावेळी या कुस्ती चे थेट प्रेक्षपण यु टयुब वरून गणेश मानगुडे यांनी केले तर या कुस्ती मैदानाचे समालोचन राजाभाऊ देवकते व धनाजी मदने यांनी केले होते.
हे कुस्ती मैदानाचे आयोजन पै सुनील बापु सावंत. पै दादासाहेब इंदलकर. सचि न मालक गायकवाड विनोद महानवर नानासाहेब मोरे पै श्रीकांत ढवळे पै तुकाराम इंदलकर पै गणेश दादासाहेब सावंत पै नागेश सुर्यवंशी पै आयुब शेख आदी जणानी केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…