रुग्णवाहिका साठी एक लाख रुपये देणगी शस्त्रक्रियेसाठी पन्नास हजाराची मदत!!!पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक उत्तर अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरसिंह चिवटे यांचा अनोख्या उपक्रमाने सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा साजरा!!!

करमाळा( प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेसाठी एक लाख रुपयाची मदत व शस्त्रक्रियेसाठी गरीब रुग्णाला रोख पन्नास हजार रुपयाची दिलेली मदत हा उपक्रम कौतुकास्पद असून अशाच पद्धतीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन समाजोपयोगी कार्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले 82 वर्ष पूर्ण केलेल्या नरसिंह चिवटे यांनी आपल्या आयुष्यात एक हजार वेळा चंद्रोदय पाहिल्यामुळे आज सहस्त्रचंद्रदर्शन केल्याबद्दल सत्कार शहरवासीयांच्या वतीने करण्यात आला यावेळी राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उपस्थित होते .यावेळी उपस्थितांचे स्वागत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे व करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी केले यावेळी व्यासपीठावर करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे युवा सेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आशाताई टोणपे बसवंती मॅडम  आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र यड्रावकर म्हणाले की आज पत्रकार नरसिंह चिवटे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा या निमित्ताने जवळपास पंधराशे रुग्णांना मोफत डोळे तपासून मोफत चष्मे वाटप करण्यात आले शिवाय तीन लाख रुपयांची औषधे मोफत देण्यात आली.अशा समाजोपयोगी कार्यक्रमाची समाजाला गरज आहे शिवाय जाहीर केलेली मदतीची रक्कम सर्वांसमक्ष साक्षीने संबंधित गरजू रुग्णाला दिली ही सुद्धा गोष्ट इतरांना प्रोत्साहन देणारी आहे.यावेळी बोलताना जयवंतराव जगताप म्हणाले की नरसिंह यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत साधेपणाने जीवन व्यतीत केले. त्यामुळेच त्यांना सर्व सुख समाधान प्राप्त झाली आहे माझे वडील कैलासवासी नामदेव राव जगताप स्वातंत्र्यसैनिक होते करमाळ्यातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे यांच्या स्नेहामुळेच आमचा राजकीय प्रवास स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे सदस्य म्हणून सुरु झाला.

मंगेश आमच्या कुटुंबाचा घटक!!!!!

खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे!!!!!

यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाची पक्षप्रमुख मंगेश चिवटे यांचा गुणगौरव करताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की मंगेश यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यात पोहचला असून आता करमाळा ची ओळख सांगताना मंगेश चिवटे यांचा नक्कीच उल्लेख करावा लागतो नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासाला मंगेश पात्र झाला असून तो आमच्या शिंदे कुटुंबाचा एक घटक झाला असल्याचे सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

8 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

22 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago