Categories: करमाळा

करमाळा तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील… आ. संजयमामा शिंदे यांचे अर्जुननगर येथे कार्यकर्त्यांचा गट प्रवेश व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी प्रतिपादन..

करमाळा प्रतिनिधी
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्यामध्ये सातत्य असायला हवे. रस्ते, वीज, पाणी या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या आहेत. या समस्यावरती तात्पुरता उपाय शोधण्याऐवजी आपण कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील असून करमाळा तालुका शाश्वत विकासाकडे येण्यासाठी काही वेळ लागेल. परंतु रिजल्ट निश्चित मिळतील असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी अर्जुननगर येथील आ. संजयमामा शिंदे गट प्रवेश व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप होते .
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, शेतामध्ये पाणी आले की समृद्धी आली असे होत नाही. पाण्यानंतर वीज ही शेतकऱ्यांची महत्त्वाची गरज आहे. पुढील 5 वर्षाचा आराखडा डोळ्यापुढे ठेवून करमाळा मतदारसंघांमध्ये विजेची समस्या भेडसावणार नाही या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या भागांमध्ये नव्याने सबस्टेशन मंजुरीसाठी आपण प्रयत्नशील आहोत . कोळगाव या ठिकाणी 5 mv चा नवीन ट्रांसफार्मर बसविण्याचे काम लवकरच मंजूर होईल .तसेच आवाटी व राजुरी येथे नव्याने सबस्टेशन उभारणी ही कामे प्रस्तावित आहेत. तसेच सौंदे, वांगी, पोमलवाडी आदी ठिकाणी सबस्टेशन होण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब अडसूळ यांनी केले. यावेळी उमेश मगर, दादासाहेब सांगडे, एड. अजित विघ्ने, चंद्रकांतकाका सरडे, शितल शिरसागर, विलास पाटील ,प्रकाश थोरात आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी कै. नामदेवराव जगताप यांच्यापासून विकासाची प्रक्रिया तालुक्‍यांमध्ये सुरू असून त्याचा वेग वाढविण्याचे काम आमदार संजयमामा शिंदे यांनी 2019 पासून केले आहे. त्यांच्या प्रत्येक कामात आपले कायमस्वरूपी सहकार्य असणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी तानाजी बापू झोळ, एड. राहुल सावंत, सुजित बागल, बाळूनाना जगदाळे, भरत अवताडे ,संदीप नेटके, प्रदीप दौंडे, अशोक काटोळे, राहुल कुकडे, समाधान दौंड, समाधान भोगे,स्नेहल अवचर, रूपाली अंधारे, सागर अंधारे यांचेसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट…
पूर्व भागात माजी आमदार नारायण पाटील गटाला भगदाड
पूर्व भागामध्ये नारायण पाटील गटाची पकड मजबूत होती. परंतु या वर्षभरामध्ये पूर्व भागात पाटील गटाला मोठे भगदाड पडले आहे. यामध्ये हिवरे येथील उमेश मगर, फिसरे येथील संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच अर्जुननगर येथील आज झालेला प्रकाश थोरात यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा प्रवेश, पांडे येथील नाना अनारसे या युवा नेतृत्वाने आमदार शिंदे यांच्या गटांमध्ये केलेला प्रवेश यामुळे माजी आमदार पाटील गटाला पूर्वभागात मोठे भगदाड पाडन्यामध्ये विद्यमान आमदार संजयमामा शिंदे गटाला यश आले आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

2 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago