करमाळ्यात दिव्यांगाना मोफत कृत्रिम पाय, हात, कॅलिपर व व्हीलचेअर वाटप शिबीर संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी  भारत विकास परिषद करमाळा, सक्षम करमाळा व क्रिएटिंग होप्स कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अपंग बांधवांसाठी कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स, व्हीलचेअर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी जवळपास शंभर दिव्यांग बांधवांना कृत्रिम जयपूर फूट, हात, कॅलिपर्स बसविण्यात आले व व्हीलचेअर देण्यात आल्या.दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. करमाळा सारख्या ग्रामीण भागामध्ये दिव्यांग बांधवांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असताना त्यांना मदत करण्यासाठी भारत विकास परिषद सदैव तत्पर राहील,अशी ग्वाही कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताजी चितळे यांनी दिली.तसेच भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की, भारत विकास परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक कार्यामुळे उपेक्षित-वंचित घटकास लाभ मिळणार असून दिव्यांग बांधवांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्वाचे असे पुण्यकर्म सर्व स्तरासाठी कौतुकास्पद व अनुकरणीय आहे त्याबरोबरच करमाळा तालुक्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी आमचे यापुढे देखील सदैव सहकार्य राहील.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारत विकास परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रविणाताई ओस्वाल, अपंग कल्याण केंद्र प्रमुख विनय खटावकर, भारत विकास परिषद पश्चिम महाराष्ट्र सचिव अभय चोक्सी, सामाजिक कार्यकर्ते श्रेनिक खाटेर, यश कल्याणी संस्थेचे गणेश करे पाटील, भाजपा चे गणेश चिवटे, भारत विकास परिषदेचे करमाळा चे अध्यक्ष मिथिल राजोपाध्ये, सचिव अमरजित साळुंखे, संजय गांधी योजनेचे सदस्य नरेंद्रसिंह ठाकूर, सिनेट सदस्य दीपक चव्हाण, डॉ.अमोल घाडगे,लक्ष्मण केकान, सचिन साखरे, नितीन आढाव, श्याम सिंधी, बापूसाहेब पाटील आदी उपस्थित होतेया कार्यक्रमासाठी आवर्जून बार्शी येथील भारत विकास परिषद चे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक चव्हाण यांनी केले तर आभार अमरजित साळुंके यांनी केले.यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्षम चे गहिनीनाथ नलवडे,निलेश जोशी, बाळकृष्ण कुलकर्णी, संतोष कांबळे, उमेश बनकर, सागर दळवी, विनायक दाभाडे, सुरज मिसाळ, दयानंद बंडगर, महेश शहाणे, प्रेम परदेशी, सौरभ शिंगाडे, मनोज कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

4 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

4 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago