करमाळा प्रतिनिधी :- ०१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना शिवसेना महिला तालुका प्रमुख तथा शिवकन्या सुरक्षा समितीच्या संस्थापिका प्रियांका गायकवाड व त्यांच्या सर्व शिवकन्या फिटनेस क्लब च्या महिलांनी आदरांजली वाहून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
यावेळी प्रियांका गायकवाड यांनी सांगितले की, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करमाळा येथे महिलांसाठी या मराठमोळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ०१ मे रोजी साजरा होत असलेला महाराष्ट्र दिन हा सर्व मराठी बांधवांसाठी आपल्या पूर्वजांनी केलेल्या जीवन त्यागाचे व मराठी अस्मितेच्या अभिमानाची साक्ष व स्मरण करून देणारा दिवस आहे. त्यामुळे आजचा हा दिवस शिवकन्या सुरक्षा समितीच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला व यापुढेही मराठी अस्मितता व मराठी संस्कृती जोपासण्याचा आम्ही सर्व समितीच्या महिला प्रयत्न करून पुढील काळात मोठा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे ही गायकवाड यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम प्रसंगी सर्व महिलांनी एकसारखा पोशाख परिधान केला होता. अनेक महिलांनी महाराष्ट्रा वरील गौरव गीते गाऊन मराठी अस्मिततेचा बाणा गीतातून सदर केला तसेच मराठी गाण्यावरील सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी उपस्थित महिलांना मंजिरी जोशी यांनी संपूर्ण बॉडी मसाज, थेरपी व विविध आजारांवरील ऍक्युप्रेशर पॉईंट बाबत संपूर्ण प्रशिक्षण दिले.
यावेळी प्रज्ञा जोशी, शुभांगी खळदकर, मनिषा माळवदकर, प्राची ठेंगडे, शैलजा मेहेर, मंजिरी जोशी, वर्षा वाघावकर, तृप्ती धिंदाळे, राणी गापाट, माधुरी पवार, वर्षा विधाते, सुमन बडेकर, लता खळदकर, आदी महिला उपस्थित होत्या.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…