अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिध्द पादुकांचा दर्शन व प्रवचन सोहळा माळशिरस, जि. साेलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न…..*

 

करमाळा प्रतिनिधी माळशिरस येथील पुणे पंढरपूर रोडवर असलेल्या शासकीय बालगृह मैदानावर शनिवार (दि. ३०) रोजी सकाळी १० वाजता अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळा संपन्न झाला. शनिवारी सकाळी १०.०० वा. शहरातील मारुती मंदिरापासून सिध्द पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत शिवाजी महाराज, झाशीची राणी, संतमंडळी, भजनी मंडळ, निशाणधारी पुरुष व महिला, ढोलपथक, कलशधारी महिला, राम पंचायतन सोहळा, भजन मंडळ सिद्धपादुका व प्रतिमा रथ, भक्त मंडळ इत्यादी विविध पथकांसह हजारो भक्तगण सहभागी झाले होते. सिध्द पादुकांचे मिरवणूकीने दुपारी ११.३० वा. कार्यक्रम स्थळी आगमन झाले. तेथे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या भक्तगणांनी सिध्द पादुकांचे भव्य स्वागत केले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरुश्रीं च्या शिकवणीनुसार गरीब, गरजु, निराधार अशा कुटुंबाचा चरितार्थ चालावा म्हणून १२ घरघंटी (पिठाची गिरणी) चे मोफत वाटप करण्यात आले. या प्रसंगी मा. आप्पासाहेब देशमुख – नगराध्यक्ष, मा. सचिन वावरे – नगरसेवक, मा. रेश्माताई टेळे – नगरसेविका, मा. मच्छिंद्र ठवरे – सभापती, ॲड. शहाजी ठवरे, मा. काकासाहेब सुर्वे – वारकरी संघ जिल्हाध्यक्ष, मा. रघुनाथ चव्हाण – नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित असणा-या हजारो भाविकांनी सिध्द पादुकांचे विधीवत गुरुपुजन केले. ज.न.म. प्रवचनकार डाॅ. दर्शनाताई राठोड यांचे प्रवचन संपन्न झाले. प्रवचनकारांनी गुरुनिष्ठेचे महत्व विषद करुन गुरुदेवांची व गुरुशक्तीची प्रचिती अत्यंत ओजस्वीपणे सांगितली. प्रवचनानंतर सुमारे २३२ भाविकांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांची उपासना दिक्षा घेतली. त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सांगता आरती झाल्यानंतर पुष्पवृष्टीने कार्यक्रमाची सांगता झाली. सोलापूर जिल्हयातील सुमारे १० हजार भाविकांनी या सिध्द पादुका दर्शन सोहळयाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सोलापूर जिल्हा जनगणना प्रमुख कु. एैश्वर्याताई माने यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्व-स्वरुप सांप्रदायाचे सोलापूर जिल्हा निरीक्षक राजेंद्र भुंयार, साेलापूर जिल्हा अध्यक्ष शरद मते, सोलापूर जिल्हा कर्नल आबासाहेब शिंदे, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सौ. सविता परांडे ताई, सोलापूर जिल्हा सचिव भूषण डोळे, जिल्हा युवा प्रमुख तुषार कांबळे, प्राेटोकॉल अधिकारी मिलिंद मोगरे, प्रोटोकॉल अधिकारी बजरंग दायमा, दिनकर कोढाळकर, शंकर गायकवाड, सौ. सुरेखाताई जामदार तसेच जिल्हा कमिटीतील सर्व पदाधिकारी, तालुका कमिटी, सेवाकेंद्र कमिटी, युवा सेना, महिला सेना, संग्राम सेना यांनी अपार मेहनत घेतली.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago