करमाळा प्रतिनिधी देशात कुंकवासाठी प्रसिद्ध असलेले करमाळा तालुक्यातील केम गाव प्रगती होण्यापासून एक पाऊल मागे सरकत आहे. कोरोना महामारी च्या अगोदर केम मध्ये तीन मोठ्या एक्सप्रेस व पॅसेंजर थांबत होत्या.त्याकाळात विद्युतीकरणाचे काम देखील पुर्ण झाले.त्यानंतर बाकीच्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले, व फक्त सोलापूर ला जाणारी व रात्री पुण्याला जाणारी पॅसेंजर चालु करण्यात आली. भाजप सरकारच्या कुरघोडीमुळे एस.टी संपावर गेली. लोकांसमोर दळणवळणाचे प्रश्न उभे झाले, लोकांचे उद्योगधंदे बंद पडले. रेल्वेसेवा बंद झाल्याने केम गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडले. व्यापारी,शेतकऱ्यांना मोठया शहरात जाणे अशक्य झाले. गावाकडे व्यावसायिक दृष्टीने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचा मार्ग बंद झाला. हा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असुन माढा लोकसभेचे खासदार, केंद्रीय रेल्वेचे सदस्य रणजितसिंह निंबाळकर यांनी देखील प्रयत्न केले असतील तरीही केमला रेल्वेचे थांबे मिळणे मुश्किल झाले आहे. असे गंभीर आरोप केम चे सामाजिक कार्यकर्ते बागल गटाचे नेते विजयसिंह ओहोळ यांनी केला आहे. जोपर्यंत रेल्वे चालु चालु होणार नाही तोपर्यंत केम चा विकास होणार नाही असेही विजयसिंह ओहोळ यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…