करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन ,ग्रामविकास विभाग यांच्या दिनांक 6 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार सन 2021- 22 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून 30 54 – 24 19 लेखाशिर्ष आंतर्गत रस्ते व पूल परिक्षण कार्यक्रम नुसार गट ब व गट क या करमाळा मतदार संघातील एकूण 17 कामांसाठी 2 कोटी रुपये निधीची तरतूद केली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मतदार संघातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांची सुधारणा या निधीच्या माध्यमातून केली जाणार आहे .यामध्ये चोभे पिंपरी ते गवळे वस्ती बारलोणी रस्ता – 10लाख, केडगाव येथील कुष्ठरोग कॉलनी ते केडगाव रस्ता – 10 लाख, कुंभारगाव राशिन रस्ता – 10 लाख, मांजरगाव कोर्टी रस्ता -10 लाख, कुंभारगाव ते हिंगणी रस्ता – 10लाख, सौंदे ते गुळसडी रस्ता – 10 लाख, पाडळी ते शिंगटे वस्ती रस्ता – 10लाख, नेरले ते आवाटी रस्ता – 10 लाख, चिखलठाण ते मुरूमाई नगर रस्ता – 10 लाख, फीसरे हीसरे हीवरे कोळगाव रस्ता – 10लाख, सौंदे ते फीसरे रस्ता – 10लाख ,अर्जुननगर ते हिवरे रस्ता – 10 लाख, पाथर्डी ते वरकुटे रस्ता – 30 लाख, विहाळ ते चोपडे रस्ता – 10लाख , कुंभारगाव ते पानसरे रस्ता – 20 लाख , गुळसडी ते कुंभेज रस्ता – 5 लाख , धायखिंडी ते करंजे रस्ता – 10 लाख या रस्त्यांची सुधारणा उपलब्ध निधीमधून केली जाणार आहे
करमाळा प्रतिनिधी इंटरनेट केबल टाकण्यासाठी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा तालुक्यात नियमबाह्य व बेकायदेशीर…
करमाळा / प्रतिनिधी करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…