आ.संजयमामा शिंदे यांचे हस्ते कुकडी प्रकल्पग्रस्त लाभार्थींना भूसंपादन धनादेशाचे वाटप.

.
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून चालू अर्थसंकल्पात कुकडी प्रकल्पग्रस्त करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनासाठी 35 कोटी निधीची मागणी केलेली होती. यापैकी 28 कोटी निधी सध्या प्राप्त झालेला असून या निधीमधून खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करण्याची काम सध्या सुरू आहे.
करमाळा तालुक्यातील एकूण 1150 हेक्‍टर क्षेत्र कुकडी प्रकल्पांतर्गत संपादित झालेले असून यापैकी 13 गावातील भूसंपादनाचे प्रस्ताव भूसंपादन कायदा 2013 अन्वये प्रांत कार्यालय कुर्डूवाडी यांचेकडे सध्या सादर केलेली असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. करमाळा तालुका लाभक्षेत्रातील वीट, झरे, करमाळा ग्रामीण, पोफळज ,जातेगाव कामोणे, रावगाव ,पोंधवडी ,पोथरे, घरतवाडी, कुंभारगाव, सावडी ,कोर्टी या 13 गावातील शेतकऱ्यांचे भूसंपादन सध्या होणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात 1 कोटी रुपये धनादेशाचे वाटप आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करमाळा येथील संपर्क कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता आर.के .जगताप, उपविभागीय अभियंता एस.डी. मेहेर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार शिंदे यांच्या हस्ते उषा कृष्णा धुमाळ, कृष्णा हरिभाऊ धुमाळ ,जालिंदर सोपान जाधव ,राजेंद्र बलभीम नलवडे, प्रल्हाद श्रीरंग जाधव , शालन रामचंद्र पाटील ,बाळू ज्ञानदेव पडवळे, महिपत बाळासो नलवडे यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले .
चौकट…
लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी पुढे यावे – कार्यकारी अभियंता आर.के. जगताप यांचे आवाहन
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत कुकडी वितरण बांधकाम विभाग कोळवडी चे कार्यकारी अभियंता आर .के. जगताप म्हणाले की, शेतकऱ्यांची कागदपत्रे वेळेत न आल्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेला विलंब लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेताचे 7/12 ,8 अ उतारे तसेच फेरफार उतारे, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर आदी कागदपत्रांसह उपविभागीय अभियंता मेहेर मो.न – 90 96 92 87 41 तसेच पॅनल वकील कृष्णा खोरे विकास महामंडळ प्रतापसिंह पाटील – 75 88163471 यांच्याशी संपर्क करून आपली भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

2 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

3 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

9 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago