करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्तेचिच शासकीय कमिटीवर नियुक्ती झाली असुन काँग्रेस पक्षाचे नुतन तालुका अध्यक्षाचा आरोप बिनबुडाचा व अर्धवट सत्य असुन तालुका अध्यक्ष होण्यापुर्वी ते कोणत्या पक्षात होते याचा त्यांनी विचार करावा असा टोला काँग्रेस पक्षाचे ओ बी सी सेल चे माजी शहराध्यक्ष चंद्रकात मुसळे यांनी लगावला यावेळी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना भाऊ पटोले यांना पाठविलेल्या ईमेल मध्ये म्हटले आहे की तत्कालीन जिल्हा काँग्रेस आय कमिटीचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष देवानंदजी गुंड पाटील. काॅग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक अशोक चोपडे या दोन पदाधिकारी ची शासकीय कमिटीवर कार्यकर्तेची नावे घेण्याकामी करमाळा दौरा केला होता त्यावेळी तत्कालीन जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांनी त्यांच्या लेटरपॅड वर काॅग्रेस आय पक्षाचे निष्ठावंत वीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावाची यादी दिली होती सदर दोन्ही निरीक्षकांनी काॅग्रेस चे तत्कालीन जिल्हाअध्यक्ष यांच्या मार्फत आमदार संजय मामा शिंदे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना दत्तात्रय मामा भरणे यांच्या कडे वीस नावाची यादी सुपूर्द करण्यात आली त्यामध्ये सोळा कार्यकर्तेची शासकीय कमिटीवर नियुक्ती करण्यात आली आहे
गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी काॅग्रेस पक्षाला शासकीय कमिटीवर घेण्यात आले नाही असा बिनबुडाचा आरोप केला आहे हे अर्धवट सत्य आहे नुतन तालुका अध्यक्ष हे त्यावेळी कोणत्या पक्षात होते हे त्यांनी स्वत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे करमाळा शहर काँग्रेस आय ओ बी सी सेल चे माजी शहराध्यक्ष चंद्रकात मुसळे यांनी पाठविलेल्या ईमेल मध्ये आहे
यावेळी अधिक माहिती देताना मुसळे म्हणाले की नुतन तालुका अध्यक्षांनी वर्तमान पत्रात आरोप केला आहे की ज्या पदाधिकारीना शासकीय कमिटीवर घेण्यात आले ते आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक आहे हा आरोप बिनबुडाचा व अर्धवट सत्य आहे उलट त्यांनी ज्या नवीन व त्यांचे समर्थक असणारे काँग्रेस कार्यकर्त्येची शासकीय कमिटीवर नियुक्ती साठी जी यादी दिली त्याचा आमदार व पालकमंत्र्यांनी विचार करावा अस कुठेही दिसुन येत नाही उलट जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते ना आमदार पालकमंत्री व माजी जिल्हाअध्यक्ष यांनी न्याय देण्याचे काम केले असल्याचे मुसळे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना भाऊ पटोले यांना पाठविलेल्या ईमेल मध्ये म्हटले आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…