मांगी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन संचालकांचा आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार.

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे लक्ष वेधून असलेल्या मांगी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे गटाने एकहाती विजय मिळविल्याबद्दल नूतन संचालकांचा व मार्गदर्शक यांचा सत्कार काल आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयात संपन्न झाला .माजी आमदार बागल व माजी आमदार नारायण पाटील यांचे विरोधात सुजित तात्या बागल यांनी आमदार संजयमामा शिंदे गट उभा केलेला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत आमदार शिंदे गटाने विरोधी गटाला धोबीपछाड करून 11 संचालक निवडून आणले . या नूतन संचालकांचा सत्कार आमदार शिंदे यांनी केला. संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल नामदेव बागल, दिलीप बागल, विठ्ठल बागल, दिवान बागल, अभिमन्यू अवचर, रमेश खरात ,नंदकुमार नरसाळे, नानासो नलवडे, संभाजी बागल, सुजित तात्या बागल या संचालकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच पॅनल प्रमुख व मार्गदर्शक म्हणून अनिल बागल, कैलास नरसाळे, महादेव जाधव, निखिल बागल, रवी शिंदे, पप्पू शिंदे, प्रताप शिरसागर, आदिनाथ चव्हाण, अनिरुद्ध नलवडे, बाळासाहेब खरात, लालासाहेब बागल, स्नेहल अवचर, सुहास बागल, प्रताप बागल, नीळकंठ बागल, कृष्णा बागल यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी ज्येष्ठ नेते बापूराव दादा गायकवाड ,उद्धव दादा माळी, दादासाहेब सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

10 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

13 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago