पोपळज गावच्या उपसरपंचपदी शालन शिंदे यांची निवड.

करमाळा प्रतिनिधी
पोफळज ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शालन पांडूरंग शिंदे यांची काल बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीचे उपसरपंच जीवन पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. पोफळज येथे उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली असता उपसरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने शालन शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
या निवडीबद्दल करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे ,माजी सरपंच व विद्यमान सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पवार ,संतोष पवार ,जीवन पवार ,माजी उपसरपंच यासीन मुलानी, संजय पवार, ग्रामपंचायत सदस्य हरिचंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य गौतम माळी ,ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब सुरवसे, ढेरे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य पोपट कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

11 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

13 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago