करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी हजरत महंमद पैगंबर ( स ) यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले असुन त्यांच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चे निवेदन आज करमाळा मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार समीर माने व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक अल्ताफ शेठ ताबोंळी. हाजी कलीम काझी माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार हाजी फारूक बेग उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी बहुजन विकास संस्था करमाळा चे अध्यक्ष इसाक पठाण ऊर्दु शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मजहर नालबंद इम्रान घोडके मतीन बागवान अझहर शेख साजीद बेग. साहील पठाण पै.समीर शेख. नदीम शेख.मिजान खान साहील शेख. अहमद बागवान रेहान बागवान जमीर मदारी मुश्ताक शेख महीबुब मिर्झा जिशान शेख अमन काझी. मुनाज शेख आमीर मुलाणी जावेद शेख इसराईल उपस्थित होते सदर निवेदनावर त्यांच्या सह्या आहेत.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भा ज प च्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना इस्लाम धर्माचा कोणताही गाढ अभ्यास नसताना हजरत महंमद पैगंबर (स ) यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे अशा विधान करणारे प्रवृत्ती ला आळा घालण्यासाठी ईशनिंदा विरोधी कायदा संमत करण्यात यावा तसेच असे अवमानकारक वक्तव्य करून मुस्लिम धर्माच्या भावना भडकविण्याचे केलेले कृत्य हे अत्यंत निंदनीय आहे त्यांनी पैगंबराविषयी जे अपशब्द काढले आहे त्याचा करमाळा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला देशात काही राजकीय लोक आपले स्वार्थ साधण्यासाठी एखादया धर्मा बद्दल बेताल वक्तव्य करून समाजातील एकता अखंडता आणि कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत आहे अशा देश व समाज विघातक वृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे त्या मुळे यासाठी शासनाने नवीन कायदा करावा असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.