करमाळा प्रतिनिधी. कोपरगाव सायकलिंग क्लब यांच्या वतीने कोपरगाव ते पंढरपूर वारी सायकल दिंडी काढण्यात आली असून यंदाचे दुसरे वर्ष असून कोपरगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौलत जाधव साहेब शिर्डी शहराचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 42 मित्रांची ही सायकल दिंडी वारी पंढरपूरला निघाली असून कोपरगाव, शिर्डी नगर,करमाळा टेंभुर्णी यामार्गे पंढरपूर या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहे या दिंडीचे स्वागत कोपरगाव शिर्डी नगर येथील नागरिकांनी स्वागत केले असून करमाळा येथे राष्ट्रवादी काॅग्रेंसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे,करमाळयाचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे कुणबी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रसिंह ठाकुर, गौरव कांबळे, महादेव आण्णा फंड, भाजप युवा मोर्चा प्रदेश सदस्य दिपक चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप फुरकान काझी,नायब तहसीलदार माजिद काझी यांनी सत्कार करून त्यांचे स्वागत केले. व पुढील दिंडीच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या या सायकल दिंडीमध्ये केशव होन , संदीप देवकर दिनेश कोल्हे बापूसाहेब सुराळकर विजयराव आढाव उमेश लोंढे, बाळासाहेब निकोले, मनोज आहेर, भास्कर सुराळकर कैलास शेळके प्रसाद निकुंभ प्रशांत शहाणे मनोज नेरे संतोष पवार नितीन त्रिभुवन दीपक सुपेकर राजेंद्र निकम, प्रशांत बहिरट, प्रशांत शिराळकर राजेंद्र सालके संदीप शिरोडे सहभागी झाले असून आली असून मानवतेच्या कल्याणासाठी व पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रत्येकानी सायकलचा वापर करणे गरजेचे आहे. आपला देश कोराना मुक्त व्हावा व संपुर्ण मानवतेच्या कल्याणासाठी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आपण ही दिंडी निघाली असुन दररोज शंभर किलोमीटर अंतराचा प्रवास करत आहे. आपला भारत देश कोरोनामुक्त व्हावा व संपुर्ण मानवतेचे जगाचे कल्याण होण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी इंटरनेट केबल टाकण्यासाठी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा तालुक्यात नियमबाह्य व बेकायदेशीर…
करमाळा / प्रतिनिधी करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…