करमाळा प्रतिनिधी जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून तहानलेल्यांची तहान भागवून त्यांना समाधानाची चार पावले आनंदाने टाकण्यासाठी देवळाली येथे कै. कल्याणभाऊ गायकवाड यांचे स्मरणार्थ आशीष गायकवाड मित्र मंडळाने वारकऱ्यांसाठी देवळाली मध्ये पाणपोई जलसेवा सुरू करण्यात आली आहे
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून देवळाली गावात पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसाठी सुरू केलेली पाणपोई म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे असे गौरव उद्गार पाणपोईचे उद्घाटन करताना करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे यांनी केले
यावेळी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सरपंच आशिष गायकवाड यांचे कौतुक करत सामाजिक कार्यात आपल्यासारख्या तरुण वर्गाची गरज व्यक्त केली यावेळी सरपंच आशिष गायकवाड बाळासाहेब गोरे गुरुजी चेअरमन रामभाऊ रायकर ,उपसरपंच धनजय शिदे,अमोल गोसावी,दत्तात्रय कानगूडे, ज्योतीराम गुंड,ग्रा प सदस्य प्रकाश कानगुडे,रामचंद्र कानगुडे, तुषार आवटे,शहाजी गोसावी, बापु गुंड, तात्यासाहेब गायकवाड ,अण्णासाहेब जगताप ,गणेश पडवळे आणि वारकरी उपस्थित होते
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…