करमाळा प्रतिनिधी जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा मानुन कोरोनाकाळातही स्वतच्या जीवाची पर्वा न करता जनतेची निरपेक्ष सेवा करणारे डाॅक्टर आरोग्य विभागाचे कर्मचारी हेच खरे देवदुत असुन पंढरीला जाणार्या वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचे काम कौतुकास्पद आहे असे मत पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केले.संत निवृतीनाथ महाराज यांच्या पालखीचे करमाळयात मोठया आनंदात उत्साहात स्वागत करण्यात आले असुन या दिंडीत सहभागी वारकरी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी वारीमध्ये चालत जात असताना बऱ्याच लोकांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो त्यावेळी त्यांना सहजासहजी वैद्यकीय सुविधा दवाखाने उपलब्ध होत नाही. वारकऱ्यांना उपजिल्हा रुग्णालय व सरपंच आशिष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देवळाली ग्रामपंचायतच्या वतीने जो वैद्यकीय मोफत सेवेचा उपक्रम हाती घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. यावेळी वारकऱ्यांना डाॅ देवकर S.P मेडिकल ऑफिसर साडे phc ,नितीन बारगजे Cho देवळाली उपकेंद्र, श्रीम आतकरे Cho झरे, श्री त्रिंबके MPW देवळाली उपकेंद्र, श्रीम साळवे ANM देवळाली उपकेंद्र,श्री आरकिले HA साडे phc, श्री तांदळे HA कोर्टी phc, श्री धारक परिचर पं.स. करमाळा आशा वर्कर्स चांदणे यादव डोलारे आयुब शेख ड्रायव्हर कोर्टी phc बापू भडंगे परिचर कोर्टी phc भोंग HA साडे phc यांनी सेवा देण्याचे काम केले असुन सरपंच आशिष गायकवाड,उपसरपंच धनंजय शिंदे बाळासाहेब गोरे गुरूजी व ग्रामसेवक नागरसे भाऊसाहेब , ग्रा पं कर्मचारी व ग्रामस्थ सर्व शिक्षक अंगणवाड़ी सेविका, मदतनीस, आशाताई आणि गावातील स्वयंसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडीतील हजारो वारकऱ्यांनी याचा लाभ घेतल्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा केल्याचे समाधान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.