वै ब्र .भु.सदगुरु रघुनाथ महाराज उंबरेकर वृध्देश्वर देवस्थान ते पंढरपुर पायी दिंडीचे साईनाथ मित्र मंडळाच्यावतीने भव्य स्वागत

करमाळा  प्रतिनिधी                                                      वै ब्र .भु.सदगुरु रघुनाथ महाराज उंबरेकर व वै गुरूवर्य पंढरीनाथ महाराज उंबरेकर यांच्या आशिवादाने व श्री ह भ प भागवत महाराज उंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र वृध्देश्वर ते श्री क्षेत्र पंढरपुर पायी दिंडीचे स्वागत साईनाथ मित्र मंडळ कुंकू गल्ली करमाळा यांच्यावतीने सोमवार दिनांक  30 जून रोजी करण्यात आले .गेल्या २२ वर्षापासुन हा सोहळा अखंडपणे चालु आहे .दिंडी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी झाले असुन यंदाच्या वर्षी साडे तिनशे ते चारशे वारकरी सहभागी झाले असुन यात पुरुष व महिला यांचा समावेश आहे. या दिंडीमध्ये-पहाटे ५ वा काकडा भजन व नंतर राम कृष्ण हरी भजन दु.जेवन व राम कृष्ण हरी भजन सायंकाळी ७ते ९ किर्तन व नंतर भोजन व विश्रांती असा दिनक्रम असल्याचे ह.भ.प.भागवत महाराज यांनी सांगितले. दिंडीच्या समवेत श्री चांगदे‌व महाराज शेडाळकर.मच्छिंद्र म उंबरेकर,शिवाजी म आडसरे. आण्णा आडसरे. बप्पा चोथे.विलास घोलप शिवाजी भाकरे पोपट पाठक दिंडी विणेकरी हरीभाऊ पाठक हे असुन दिंडीचा सोहळा संप्पन करण्यासाठी त्यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. दिंडीच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करमाळा शहरातील कुंकु गल्लीतील साईनाथ मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आली. महिला भगिनींनी वृध्देश्वर दिंडी पालखीचे स्वागत करुन वारकरी व भाविकांना अन्नदान केले या दिंडीच्या स्वागताला युवक तरुण अबाल वृध्दासह महिला यांनी मोठया उत्साहाने सहभाग घेऊन विठु नामाच्या गजर करुन हरीनामाचा जयजयकार करुन दिंडी सोहळा आनंदात संप्पंन झाला.

saptahikpawanputra

Recent Posts

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शंभूराजे जगताप यांचा टीडीएफतर्फे गौरव टीडीएफचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

1 day ago

सांगोल्यातील डॉ.धनाजी जगताप व डॉ.सारिका जगताप यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषध उपचार

सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…

2 days ago

करमाळ्याच्या मातीतील रंगांचा दिल्लीच्या क्षितिजावर आविष्कार… चित्रकार निवास कन्हेरे यांचे ‘Prismatic Resonances’ चित्रप्रदर्शन; २३ नोव्हेंबरपासून राजधानीत कलात्मक पर्वणी

  करमाळा  प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…

2 days ago

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

  करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…

2 days ago

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…

3 days ago