करमाळा प्रतिनिधी राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार आहेत. लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, दुधनी, मोहोळ, अनगर, सांगोला, मंगळवेढा, अकलूज, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी या नगरपालिकांची निवडणूक होत आहे.
पाच जुलै रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रामाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर 20 तारखेला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. त्यानुसार 22 जुलै ते 28 जुलै अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. या निवडणुकांसाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान तर 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…