करमाळा प्रतिनिधी घारगाव(करमाळा) मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने काढली चिमुकल्याची दिंडी दिंडीतुन पर्यावरण सर्वंधनाचा संदेश दिला आहे
जय जय राम कृष्ण हरी! ज्ञानोबा माऊली ,माऊली ,तुकाराम, मुक्ताबाई, जनाबाई ,एकनाथ असा अखंड जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव मधील छोट्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे दिंडी काढली.
यावेळी हातात भगवे झेंडे व पर्यावरणाचा संदेश देणारे फलक झाडे लावा झाडे जगवा, मुली वाचवा देश वाचवा, सुंदर माझे गाव स्वच्छ माझे गाव ,पाणी वाचवा जलसंवर्धन करा असे अनेक संदेश देणारे फलक हातात घेऊन पर्यावरण संवर्धन करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी नको पांडुरंग मला सोन्याचे चांदीचे दान रे! फक्त भिजव पांडुरंग हे तहानलेले रान रे!! कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू! ढगाला थोडे हलवून भिजव माझे गाव तू! असे विविध अभंग बोलत पालखी सोहळा साजरा करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताई ,तुकाराम, एकनाथ, जनाबाई डोक्यावर तुळशी वृंदावन गळ्यात माळा विविध संतांची वेशभूषा करून गावात दिंडी काढण्यात आली.
हा बालगोपालांचा सोहळा साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रामहरी जाधवर सर बुधवंत सर खान सर कानडे सर व शिक्षक सहशिक्षका असे अनेक जणांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…