करमाळा प्रतिनिधी कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामात पेरणीसाठी संरक्षित ठेवण्यात आलेला खताचा साठा खुला करण्यात आला आहे. या खताचे वाटप दुकानामधून सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर व दिनेश मडके यांच्या हस्ते हा या खताचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्याला दोन पोते प्रत्येकी 1350 दराने खात उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी आधार कार्ड घेऊन यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले आहे.
करमाळ्यात महेश ऍग्रो एजन्सी येथून शनिवारी शेतकऱ्यांना या खताच्या वाटपास सुरुवात झाली. कृषी विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी साधारण ८ हजार मॅट्रिक टन जवळपास आठ कोटीचा खताचासाठा संपूर्ण जिल्ह्यात राखून ठेवला होता. हा साठा खुला करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यासाठी 175 मॅट्रिक टन डीपी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हे खत कंदर व करमाळा यासह इतर ठिकाणच्या विक्रेत्यांकडे उपलब्ध करून दिले आहे. कृषी अधिकारी शंकर मिरगणे यांच्या नियोजनाखाली या खताचे वाटप करण्यात येत आहे. राजेंद्र मिरगळ यावेळी उपस्थित होते.
सुजित बागल म्हणाले, तालुक्यात वाढलेले ऊस व केळीचे क्षेत्र पाहता साधारण 5 हजार मॅट्रिक टन डीएपीची गरज आहे. पण उपलब्ध असलेला साठा अत्यंत किरकोळ आहे. करमाळा तालुक्यासाठी अजून मोठ्या प्रमाणावर खताचा साठा उपलब्ध करून द्यावा. करमाळा तालुक्यासाठी साधारण 5 हजार मॅट्रिक टन डीएपीची गरज आहे.
नॅनो युरियाचा वापर करावा : संजय वाकडे
सध्या युरियाची टंचाई असल्याचे जाणवते. यावर पर्याय म्हणून नॅनो टेक्नॉलॉजी आधारित नॅनो युरिया केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे. या एका बाटलीच्या फवारणीमुळे एक युरिया पोत्याची ताकद पिकाला मिळते. यामुळे नॅनो युरियाचाही वापर शेतकऱ्यांनी करावा, असे आव्हान तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले आहे.