करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषद निवडणुकीत यावेळी सत्तापरिवर्तन अटळ असून त्याकरिता बागल गट संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून निश्चितपणे पालिकेची निवडणूक जिंकू असा निर्धार मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी व्यक्त केला.
बागल संपर्क कार्यालयात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागल गटाचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांची महत्वाची बैठक आयोजित केली होती त्यावेळी या बैठकीत श्री. बागल बोलत होते. यावेळी विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी बैठकीतील उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व इच्छुक उमेदवार व नगरसेवकांनी आपल्या प्रभाग व वॉर्डातून निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागावे, बागल गट पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे, गाफील न राहता प्रत्येक नगरसेवक व कार्यकर्त्याने आपल्या बागल गटाचा विकासाचा कार्यक्रम सर्व वॉर्डातील प्रत्यर्क मतदारांपर्यंत पोचवावा.
सत्तापरिवर्तन करून शहराचा विकास कसा करता येईल यासाठी गट-तट, रुसवे-फुगवे दूर करून सर्वांनी आपल्या नेत्या रश्मीदीदी बागल यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवून आपण जिंकणार आहोत असा खंबीर आत्मविश्वास व्यक्त करून आपल्या उपयुक्त व अनुभवी सूचना उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी अधिक बोलताना श्री. बागल म्हणाले की, करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन नागरपरिषेच्या माध्यमातून शहरातील सर्वसामान्य नागरिकांची कामे, शहराचा सर्वांगीण विकास, रस्ते व पाणीपुरवठा इत्यादी सुविधा देण्यासाठी सर्वसामान्य मतदारांच्या आशीर्वादावर सर्वजण मिळून या निवडणुकीला बागल गट सामोरा जाणार असून, ही निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी बागल गट सक्षम आहे.
समविचारी व विकासाच्या भूमिकेतून येऊ इच्छिणाऱ्या घटकांचे स्वागत आहे.
करमाळा शहराची अवस्था पहिली तर शहराला आधुनिक व विकसित रूप देण्याकरिता शहराच्या चारही बाजूंचे रस्ते व शहराला जोडणारे चारही दिशांचे रस्ते सुशोभित करणे, शहरामध्ये सुनियोजित अंतर्गत, भूमिगत गटारी (अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम), प्रत्येक गल्ली, वॉर्ड मधील शेवटच्या घरापर्यंत पोहचवणारे रस्ते, दिवाबत्तीची आधुनिक सुविधा, स्वछता, इत्यादी गोष्टींबाबतचे विकासाचे धोरण घेऊन बागल गट पूर्ण ताकदीने येत्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
यावेळी बागल गटाचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…