श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपुर्णा योजनेस सहकार्य करुन‌ वाढदिवस साजरा करण्याचा साळुंके कुंटुंबाचा आदर्श घ्यावा – गणेश भाऊ चिवटे

करमाळा प्रतिनिधी श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपुर्णा योजनेस सहकार्य करुन‌ वाढदिवस साजरा करण्याचा साळुंके कुंटुंबाचा आदर्श घ्यावा वाढदिवस तर सगळेच साजरे करतात, पण आपण ज्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय आदर्शवतच आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश‌ भाऊ चिवटे यानी व्यक्त केले. जिल्हा माध्यमिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद साळुंके सर यांचे चिंरजीव शुभनीत मुंकुद साळुंके यांचा वाढदिवस श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपुर्णा योजनेतुन जेष्ठ अबाल वृध्द अपंग निराधारांना मिष्ठान भोजन देऊन सामाजिक बांधलिकीच्या भावनेतुन सामाजिक उपक्रमाने  वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी मुकुंद साळुंके सर,पत्रकार जयंत दळवी,सौ.राणीताई साळुंके मॅडम,पत्रकार आशपाक सय्यद,अलीम शेख दिनेश मडके उपस्थित होते. अनाथ, गरीब, गरजू लोकांसाठी त्यांच्या दोन वेळच्या जेवणासाठी आर्थिक स्वरूपाची जी देणगी देवून त्यांच्या उदरनिर्वाहाचे महान कार्य केले आहे, त्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोतच. त्या सर्व लोकांच्या अंतकरनातून आप्ल्यासाठी निघालेले शुभ आशीर्वाद आपले पुढील आयुष्य सुख-समृद्धीने व्याप्त होईल. याची खात्री असल्याचे गणेश चिवटे यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago