नगरपलिकेबाबत कोणता विचार मतदारांपर्यंत पोहचवायचा हे बागल गटाने स्पष्टपणे सांगावे -माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगर परिषदेच्या निवडणूक पाश्वर्भूमीवर बागल गटाचा नेमका कोणता विचार करमाळा शहरातील मतदारांच्या घराघरात पोहचवायचा हे बागल गटाने अस्पष्ट सांगण्यापेक्षा स्पष्ट सांगून टाकावे; असा टोला माजी आमदार व जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप यांनी दिला आहे.
करमाळा नगरपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी आपल्या बागल गटाचे विचार घराघरात पोहचवा; अशा सूचना दिल्या. त्याबाबत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना मा.आ.श्री. जगताप म्हणाले की, नेमका यापैकी कोणता विचार कार्यकर्त्यांनी घराघरात पोहचवायचा… भुलथापा, स्वप्नाळू व भावनिक भाषणे करून जनतेला भुलविण्याचा, विरोधी गटातील माणसे फोडून त्यांचा तेवढ्याचवेळेच्या निवडणुकीपुरता वापर कसा करायचा, आयत्या संस्था बळकावणे, ज्यांनी बोटाला धरून मोठं केलं त्यांनाच गोठवण्याचा कसा प्रयत्न करायचा, लोकांना आपण केलेल्या भ्रष्ट कारभाराचा विसर कसा पाडायचा, आदिनाथ-मकाई साखर कारखाने कसे तोट्यात आणले, जगताप गट, मोहिते-पाटील गट, भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता शिवसेना नंतर पुढे काय असेल हे नक्की नाही.असे राजकारण करायचे, यातून नेमका कोणता विचार शहरातील मतदारांच्या घराघरात पोहचवायचा दिग्विजय बागल यांनी सांगून टाकावे म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांना ते बीज लावणे सोपे होईल. कारण नेमकं त्यांनाही माहित नाही तुमच्या मनात कोणता विचार आहे.अनेक गावपुढारी, करमाळा शहरातील जगताप गटाचे शिलेदार यांना तेवढ्यापुरते आपलेसे करून आपल्या गटात घेतले व नंतर त्यांची साधी विचारपूस तर सोडाच, पण कोणत्याही राजकीय सत्तेत त्यांना कुठे सामावून घेतल्याचे आठवत नाही, आमच्या कंपनीतला माल पळवून नेऊन त्यांनी त्यांची दुकानदारी थाटली आहे. ही वस्तुस्थिती आहे, हे कोणीही नाकारणार नाही, करमाळा तालुक्याच्या व शहराच्या विकासात तुमचे किती योगदान आहे, हे जनतेला माहित आहे.तुम्ही किती विकासप्रिय व जनहितवादी आहात ते कारखान्यांच्या कारभारातून सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे जनता तुमच्या कोणत्याही आपलेपणाच्या भाषणबाजीला फसणार नाही, जगताप गटच खरा जनतेचा गट असून जगताप गटाशिवाय कोणालाही नगरपरिषदेत जनता सत्ता देणार नाही; हा जनतेचा ठाम निर्धार व माझा ठाम विश्वास आहे. असेही श्री.जगताप यांनी म्हटले आहे. आजपर्यंत जनतेने दिलेली नगरपरिषदेची सत्ता आम्ही चांगली राबवली. आदिनाथसारखी आम्ही डबघाईला आणून बाजुला थांबलो नाहीत; याचीही आठवण माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करून दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago