गुरुपोर्णिमा विशेष महिमा सद्गगुरु सारखा असता पाठीसारखा ।इतरांची लेखा, कोण करी ।

गुरुपोर्णिमा विशेष महिमा सद्गुरू साईखा असता पाठीसारखा ।इतरांची लेखा, कोण करी
आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वर्षभरात ज्या काही १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. हिंदु धर्मांतमहर्षी व्यास आदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. म्हणुनच गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.
॥गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर
गुरु साक्षात् परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नमः॥
या श्लोकात तर गुरुला वंदन करुन गुरुला देवतुल्य दर्जा दिला आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच आहे ते गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे.
आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत. मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू.
अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.
खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे.
सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे. त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरू पूजन.
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्य दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत.

सद्गुरू सारीखा असता पाठीराखा ।
इतरांची लेखा कोण करी ॥

किंवा

सद्गुरू वाचोनी सापडेना सोय ।
धरावे जे पाय आधी आधी ॥
ही आपल्या मनावर केलेली खोल नोंदणी आहे. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत.

उदा : व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी, श्रीगुरु श्रीपाद वल्लभ, श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज, श्रीगुरु स्वामी समर्थ महाराज,मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ……

ह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात. एखादी भेटवस्तू देतात. अशा वस्तू देणे. नारळ हार पेढे शाल गुरूंना देणे ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानं गुरूंना केलेत नमन. त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणांगती.
असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरू आशिषामधून गुरूतत्त्व कृपावर्षाव करत असते.
त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ह्याच उदा. म्हणजे निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य.
गुरूवंदनांत गुरू नमनांत शरणांगत भाव हवा कृतज्ञता हवी.
महर्षी व्यास ह्यांना जगद्गुरू मानतात. त्यामुळेच कांही जण ह्या गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं ही म्हणतात.
गुरूला अनन्य भावे शरण जाणाऱ्या. गुरू महती कळालेल्या अनुभवलेल्या प्रत्ययी आलेल्या शिष्य मुखातून मग हेच विश्वास पूर्ण शब्द बाहेर येतात की..
सद्गुरू साईखा असता पाठीसारखा ।
इतरांची लेखा, कोण करी ।
गुरूपौर्णिमेच्या दिवशी काय करावे?
१. यादिवशी केवळ गुरूच (शिक्षकच) नाही, तर आई-वडिल, मोठ्या भाऊ-बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे.
२. यादिवशी वस्त्र, फळ, फुले व हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवला पाहिजे. कारण गुरूचा आशीर्वाद विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी आणि ज्ञानवर्धक असतो.
३. व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास-मनन करून त्यांच्या उपदेशांचे आचरण केले पाहिजे.
४. हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरूप्रती दाखविलेला विश्वास, आदर आहे.
आपले श्रीगुरू किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्या.तस्मै श्री गुरुवे नमः……
नमो श्रीगुरू नृसिंहसरस्वती दत्त महाराज

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना राज्यकर्ते समाजाने ‌शासनाने न्याय मिळवून द्यावा-ज्येष्ठ पत्रकार ॲड बाबुराव हिरडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाचे अविरत सेवा करणारा ‌ प्रमुख घटक…

13 hours ago

देशभरातील पत्रकार, संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा

मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…

1 day ago

अमोल जाधव यांना ‘युवा भिम सेना’चा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार

करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…

2 days ago

Tv 9 मराठीचे पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशशब्द फाउंडेशनचा पुणे येथे राज्यस्तरीय क्रांतिसूर्य पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी Tv 9 मराठीचे करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य…

2 days ago

मुलींनी स्वतःच्या पायावर उभा रहावे -तहसीलदार शिल्पाताई ठोकडे

करमाळा प्रतिनिधी पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या…

3 days ago

समरसतेची वारी… साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी… साहित्यिकांची घरी’* या उपक्रमाचा शुभारंभ

सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…

3 days ago