करमाळयाचे प्रकाश लावंड ” मेघदूत ” पुरस्कारानं सम्मानित.

 

करमाळा प्रतिनिधी बार्शी येथील *कवी कालिदास मंडळानं* प्रकाश लावंड यांना *काडवान* कविता संग्रहासाठी,” मेघदूत ” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या शानदार सोहळ्यात प्रमुख पाहुणे साहित्यिक डॉ. राजेंद दास आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकुमार शितोळे यांच्या शुभ हस्ते प्रकाश लावंड यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी कवितेवर भाष्य करताना प्रमुख अतिथी डाॅ.राजेंद्र दास बोलले,जो कविता जगतो,तोच चांगली कविता लिहू शकतो.ज्यानं माणूसपणं जपलं आहे,इतरांच्या माणूसपणाला समजून घेतलं आहे,तोच चांगली कविता लिहू शकतो.आपल्या भाषणात त्यांनी केशवसुत,बालकवींसह इतर कवींचा आदरानं उल्लेख केला.
परिक्षक प्रा.प्रमिलाताई देशमुख यांनी काडवान कविता संग्रहातील कवितांची सौंदर्य स्थळं उलगडून दाखवताना या संग्रहातील कवितांचा सविस्तर धांडोळा घेतला. या संग्रहातील माझा विठ्ठल फाटका,निधडा,मार्ग,फुटकी काकणं, वाडा,आटपाट शिवार होतं या कवितांवर भरभरून बोलल्या.
प्रकाश लावंड यांनी आपल्या मनोगतातून आपल्या काव्य प्रेरणांचा व काव्य वाटचालीचा पट उलगडून दाखवला.
या कार्यक्रमाला कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, प्रकाश गव्हाणे, प्रा. प्रमिला देशमुख,दत्ता गोसावी, शब्बीर मुलाणी, कवी खलील शेख, कवी ओडिसियस,गझलकार नवनाथ खरात, किरण गायकवाड, प्राचार्य नागेश माने, रिझर्व बँकेचे निवृत्त अधिकारी गणेश चिंचोले आणि श्री लावंड यांच्या कुटुंबियांसह मोठ्या प्रमाणात काव्य रसिक हजर होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

17 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago