देवीचामाळ हे ब वर्ग तिर्थक्षेत्र आहे.या तीर्थक्षेत्रसाठी आ. संजयमामा शिंदे ज्या वेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी भरीव निधी दिलेला होता. आमदार झाल्यानंतर त्यांनी पर्यटन विभागाकडून यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे.
या निधीमधून कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीट करणे व व पेविंग ब्लॉक बसवणे यासाठी 99. 80 लक्ष ,श्रीक्षेत्र कमला देवी मंदिराकडे जाणारे रस्ते डांबरीकरण करणे यासाठी 67. 64 लक्ष, श्रीक्षेत्र कमलादेवी मंदिर क्षेत्रास संरक्षक भिंत बांधणे यासाठी 148. 76 लक्ष,श्री. कमलादेवी मंदिरासाठी वाहनतळ करणे 90.40 लक्ष, कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्त्यासाठी स्ट्रीट लाईट बसवणे 15 लक्ष, कमलादेवी मंदिर यात्री निवास बांधने 80 . 54 लक्ष , कमलादेवी मंदिर क्षेत्र स्नानगृह, मुतारी बांधणे 21.72 लक्ष, मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे 6 लक्ष ही कामे या निधीमधून होणार आहेत.
कमलाभवानी मंदिरास प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्यामुळे मंदिराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल देवीचामाळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…
करमाळा प्रतिनिधी Tv 9 मराठीचे करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य…
करमाळा प्रतिनिधी पुरुषाबरोबर स्त्रिया सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत असून स्वतःच्या पायावर उभा राहूनच आपल्या…
सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…
भिगवण प्रतिनिधी : स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या…