करमाळा प्रतिनिधी साहित्य संस्कृतीचा पाया घालणाऱ्या आज दुर्लक्षिल्या गेलेल्या आदिवासी धनगरांनी देशाच्या साहित्य संस्कृती आणि सामाजिक इतिहासाला नवे वळण देण्यासाठी आपले स्वतंत्र साहित्य समेंलन भरविण्याचा अत्यंत यशस्वी प्रयत्न गेल्या तीन वर्षापासुन सुरु केला असुन यंदा धनगर समाजाचे जेष्ठ नेते स्व.गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ सांगोला येथे येत्या 23व 24 जुलै रोजी धनगर साहित्य समेंलन संप्पन होणार असल्याचे संस्थापक डाॅ .अभिमन्यु टकले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
समाजांमधील विविध अडीअडचणी समाज माध्यमात मांडण्यासाठी आदिवासी धनगर या साहित्य संमेलनाची सुरुवात मागील चार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. सांगोल्याचे आमदार स्व. गणपतराव देशमुख यांची इच्छा होती हे अधिवेशन सांगोल्यात व्हावे यातून समाजाला व तालुक्यातील लोकांना विविध गोष्टी कळाव्यात पण ते हयात असताना हे अधिवेशन झाले नव्हते. पण त्यांच्या पश्चात आता ह्या अधिवेशनाची नियोजन करण्यात आले आहे
आदिवासी धनगर जरी या संमेलनाला नाव असेल तरीही ते केवळ फक्त आदिवासी किंवा धनगर समाजासाठी नसून सर्व जाती धर्मांसाठी हे अधिवेशन सर्व साहित्यांचा साहित्यिकांसाठी खुले राहणार आहे व आजपर्यंतच्या झालेल्या तीन अधिवेशनात हे अधिवेशन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. यामुळे याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. सदरच्या साहित्य संमेलनाला जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक उपस्थित राहून याचा आस्वाद घेतात. सदरचे अधिवेशन हे तीन दिवस चालणार असून सांगोला येथे आयोजन करण्यात आले आहे.
या धनगर साहित्य समेंलनाला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीची नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. त्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी याबाबत चर्चा सुरू असल्याचे धनगर साहित्य समेंलनाचे आयोजक संस्थापक डाॅ.अभिमन्यु टकले यांनी सांगितले
यावेळी आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. अभिमन्यू टकले, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, धनगर धर्म पिठाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोळेकर, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, तात्या काळे उपस्थित होते.
सोलापूर प्रतिनिधी समरसतेची वारी... साहित्यिकांच्या घरी* समरससता साहित्य परिषद महाराष्ट्र सोलापूर शाखेच्या वतीने *‘समरसतेची वारी...…
भिगवण प्रतिनिधी : स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या…
करमाळा प्रतिनिधी - भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा विधानसभा सदस्य नोंदणी मध्ये…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना या संस्थेच्या वतीने शौर्यदिनानिमित्त कोरेगाव…
करमाळा प्रतिनिधी. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने डॉ…
करमाळा प्रतिनिधी.प्रा निकत सरांचे ज्ञानसेवा सोशल फाऊंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या वर्धापन दिनानिमित्त मा…