करमाळा प्रतिनिधी
गटशेती करणाऱ्या शेटफळ येथील प्रगतशील शेतकऱ्यांचे शेतीमधील सुक्ष्म नियोजन व बाजारभिमुख शेतीपद्धतीचे काम वाखान्यांजोगे असून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आसल्याचे प्रतिपादन
करमाळा तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी शेटफळ ता करमाळा येथील गटशेतीला भेटी प्रसंगी आयोजित शिवाय फेरी कार्यक्रमात प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनी व नागनाथ शेतकरी गटाच्या वतीने शिवाय फेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वाकडे यांनी गटशेती प्रकल्पातील शेतकऱ्यांसह प्रगतिशील महीला शेतकरी हर्षाली नाईकनवरे , नानासाहेब साळूंके, विजय लबडे यांच्या केळी,पेरू सिताफळ प्लॉटवर जाऊन इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.यावेळी गटशतीच्या माध्यमांतून दिल्ली बाजारपेठेत मार्केटिंग करत लोकविकासचा ब्रॅंड तयार केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. प्रत्येक शेतकऱ्यानी आशा प्रकारे शेतात उत्पादित मालाचे स्वतः मार्केटिंग व ब्रॅंडीग करणे गरजेचे आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेसारख्या योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले यावेळी लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या पॅकहाऊसला भेट देऊन पाहणी करून सुचना केल्या यावेळी लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीचे वैभव पोळ प्रशांत नाईकनवरे, विष्णू पोळ, गजेंद्र पोळ, ,विजय लबडे, कैलास लबडे, नानासाहेब साळूंके, जिजाऊ शेतकरी गटाच्या अध्यक्षा हर्षाली नाईकनवरे, मंदाकिनी साळूंके, शिवाजी निंबाळकर, शिवाजी नाईकनवरे, राजेंद्र साबळे,सचिन निंबाळकर,सनी पोळ यांच्यासह गटातील शेतकरी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना…
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार’ आणि ‘पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे…
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…