करमाळा प्रतिनिधीी
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदानी असलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेची आढावा बैठक आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. 15 जुलै 2022 रोजी आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय करमाळा येथे संपन्न झाली .या बैठकीसाठी दहिगाव योजना सिव्हिल विभागाचे उपअभियंता अवताडे साहेब , शाखा अभियंता कांबळे साहेब, हायड्रो विभागाचे कार्यकारी अभियंता चौकडे, उपअभीयंता तरंगे व मेकॅनिकल विभागाचे उपअभियंता गोरे यांच्याबरोबरच माजी जि. प. सदस्य विलास राऊत, पंचायत समितीचे सदस्य प्रतिनिधी दत्ता जाधव ,स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर, प्रवीण शिंदे गुरुजी, सुरज ढेरे आदी उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये दहिगाव योजनेच्या दोन्हीही पंपगृहातील सद्यस्थिती, पंपांची सुरू असलेली कामे व काम पूर्ण होणे बाबतचा कालावधी, निधी बाबतच्या अडचणी या विषयावरती प्रामुख्याने चर्चा झाली. यावेळी बोलताना आ. संजयमामा शिंदे म्हणाले की, सर्व विभागांचा समन्वय साधून योग्य पद्धतीने काम करा. मला रिझल्ट द्या .महावितरण विभाग ,हायड्रो विभाग, मेकॅनिकल विभाग व सिव्हील विभाग या चारही विभागाच्या समन्वयातूनच ही योजना योग्य पद्धतीने चालेल .प्रत्येक विभागाच्या ज्या काही अडचणी असतील त्या वरिष्ठ पातळीवरती सोडवण्यासाठी आपण लवकरच बैठक घेऊ व त्या अडचणी सोडवू.
सद्यस्थितीमध्ये उजनी धरणामध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्यामुळे लवकरच ओव्हरफ्लो आवर्तन सुरू करण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना तातडीने करा, दरवर्षी उन्हाळी आवर्तनाला अडचणी येत असतात त्यामुळे या ओव्हर फ्लो आवर्तनापासूनच काटेकोरपणे अंमलबजावणी करा अशा सूचना आ. संजयमामा शिंदे यांनी अधिकारी मंडळींना दिल्या.
करमाळा प्रतिनिधी मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे लोकनियुक्त सरपंच कै. संतोष पंडितराव देशमुख यांची…
करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…