माणसात देव भेटला, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे .*

*माणसात देव भेटला, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे .

*बिहार येथे दुर्घटनेत जखमी झालेल्या मराठी कुटुंबाला विशेष विमान (Air Ambulace) ने आणले पुण्यात.*

*मध्यरात्रीपर्यंत जागे राहून मुख्यमंत्री यांनी निभावली पालकत्वाची जबाबदारी.*बिहार मधील पाटणा येथे, महाराष्ट्रातील मौजे गुरसाळे, ता.खटाव जि.सातारा येथील, श्री.अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चारही लोकांना मोठ्याप्रमाणात भाजले. त्यांना तात्काळ पाटणा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे जळालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या स्पेशल दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि Air Ambulance मिळणेसाठी प्रयत्न सुरू केले.

यावेळी Air Ambulance कंपनीने एका वेळी एकच रुग्ण नेता येईल असे सांगितले. त्यामुळे सदर कुटुंबाचे नातेवाईक हतबल झाले. हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार, हा गंभीर प्रश्न समोर ठेवून शनिवारी दिवसभर अश्रू ढाळत होते. या वेळी नातेवाईकांनी त्यांच्या भागातील अनेकांकडे मदतीचा हात मागितला पण यश येऊ शकले नाही. हवाई वाहतुकीचा अमाप खर्च असल्याने नातेवाईकांचा मानसिक ताण वाढत चालला होता.

त्यावेळी एका नातेवाईकाने सांगलीचे आमदार अनिल बाबर यांचे मार्फत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सूत्रे फिरण्यास सुरुवात झाली. खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ, शासकीय Air Ambulance मिळण्यासाठी विनंती केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय Air Ambulance उपलब्ध होऊ शकली नाही.

वेळ अतिशय नाजूक असल्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून २, Air Ambulance बुक केल्या. आणि त्या कुटुंबाला, दिवस उजाडण्याचा आत पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यास दिले. आणि विमान दिवस उजेडण्याच्या सुमारास पाहिले विमान दाखल झाले. जखमीपैकी ११ वर्षाच्या मुलास घेऊन आज सकाळी ६ वाजता स्पेशल विमान (Air ambulance) पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जखमी पैकी दुसऱ्या १२ वर्षाच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान (Air Ambulabce) सकाळी ११ वाजता विमानतळावर दाखल झाले. दोन्ही जखमी रुग्णांना, शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून, येथे चांगल्याप्रकारे उपचार सुरू आहेत.

वेळेवर मदत मिळाल्याने रुग्णाचे नातेवाईक विमानतळावर अश्रू ढाळत होते. आमच्याकडे शब्द नाहीत, माणसांत देव असतो, हे आज आम्हाला समजल्याची भावना व्यक्त करत होते. नाव, गाव, पत्ता, ना ओळख, ना कोणाची शिफारस, काहीही माहिती नसताना साहेबांनी आम्हाला मदत केली. मदतीसाठी आम्ही खूप लोकांना बोललो पण मदत होऊ शकली नाही. परंतु शिंदे साहेब आमच्या मदतीला धावून आले. आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्या रूपाने साक्षात विठ्ठल पाहिल्याची भावना रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत होते. तसेच मुलं बरी झाल्यानंतर त्यांना घेऊन शिंदे साहेबांना भेटण्यास घेऊन जाणार असल्याचे रुग्णाच्या आईने सांगितले. आमच्या मूळ गावी हे समजल्याने सर्व गावकऱ्यांनी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केले. तसेच बिहार येथेही शिंदे साहेबांबद्दल तेथील स्थानिक व मराठी लोकांनी “शिंदे साब को मान गये” अशी भावना व्यक्त केल्याचे सांगितले. ही सर्व हकीकत सांगताना, रुग्णांच्या नातेवाईकांच्या अंगावर काटे व डोळ्यात पाणी येत होते. आणि जो पर्यंत आम्ही जिवंत आहोत तो पर्यंत शिंदे साहेबांच्या मदतीची परतफेड करू शकणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

17 hours ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

2 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

2 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

3 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

4 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

6 days ago