अट्टल व सराईत गुन्हेगार खाजा काळे करमाळा पोलिसांच्या ताब्यात

करमाळा प्रतिनिधी करमाळयाचे  पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना गोपनीय माहिती मिळाली की करमाळा पोलीस ठाणे कडील तसेच रेल्वेमध्ये दरोडा,जबरी चोरी मधील फरारी आरोपी जिंती भगतवाडी केत्तुर गाव शिवारात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक कोकणे यांनी लागलीच सपोनी कुंजीर,पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पो कॉ तोफिक काझी, यांचे पथक रवाना केले.
वरील पथकाने  पारेवाडी गावच्या शिवारात सापळा रचून करमाळा पोलीस ठाणे कडील दरोडा, जबरी चोरी मारहाण मधील फरारी आरोपी खाजा राजेंद्र काळे वय 40 राहणार भगतवाडी तालुका करमाळा यास मोठ्या शिताफीने अटक केली. सदर आरोपीवर करमाळा पोलीस ठाणे मध्ये भादवि कलम 326 प्रमाणे गुन्हा दाखल असून करमाळा, दौंड,कुर्डुवाडी,बारामती येथे आज पर्यंत दरोडा ,जबरी चोरी, दरोड्याची पूर्वतयारी यासारखे 11  गुन्हे दाखल आहेत सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरचा आरोपी कोणाला पाहिजे असल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे यांनी केले आहे
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल हिरे ,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल हराळे करत आहेत.
saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

20 mins ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago