करमाळा प्रतिनिधी सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण पन्नास टक्के भरले आहे. सोमवार (ता. 18) सायंकाळी 6 वाजेपर्यंत या उजनी धरणाचा पाणीसाठा 47.52 टक्के झाला आहे.यावर्षी उजनी धरण जूनमध्ये मायनस 13 टक्केवर गेले होते. आता पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी आंनदी झाला असुन उजनी धरणाचा पाणीसाठा समाधानकारक झाल्यानंतर जलाशयावरील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, औद्योगिक वसाहती व शेतीला धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो. यावर्षी सुरुवातीला पाऊस लांबल्यामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरणा की नाही? अशी शंका होती मात्र पावसाने आता जोर धरल्याने एक महिना अगोदरच अर्धशतकापर्यत पाणीसाठ्याने मजल मारली असल्यामुळे लवकरच उजनी धरण भरणार आहे.
सध्याची स्थिती
एकूण पाणी पातळी : 494.175 मिटर
एकूण पाणीसाठा : 89.12 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा : 25.46 टीएमसी
एकूण टक्केवारी : 47.52 टक्के
उजनीत येणारा विसर्ग
बंडगार्डन : 11001 कयुसेक
दौंड : 23995 क्यूसेक
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…